Ira Khan Photos: आमिर खानची मुलगी आयरा खानने बॉयफ्रेंडच्या आईची नेसली साडी; कॅमेऱ्यासमोर दिली रोमँटिक पोज

Ira Khan Photos | बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान त्या कलाकारांच्या मुलांमधील एक आहे, ज्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला नाही. मात्र चर्चेत नेहमीच राहतात. आयरा खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या वैयक्तिक जीवनावरून नेहमीच चर्चेत राहिली आहे.

  Aamir Khan's daughter Ira Khan poses in front of camera in boyfriend's mother's sarees
आमिर खानची मुलगी आयरा खानने बॉयफ्रेंडच्या आईची नेसली साडी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आमिर खानची मुलगी आयरा खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे.
  • आयराने तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेच्या आईची साडी नेसून फोटो शेअर केला आहे.
  • ती नुपूर शिखरसोबत अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.

Ira Khan Photos | नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची (Amir Khan) मुलगी आयरा खान (Ira Khan) त्या कलाकारांच्या मुलांमधील एक आहे, ज्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला नाही. मात्र चर्चेत नेहमीच राहतात. आयरा खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या वैयक्तिक जीवनावरून नेहमीच चर्चेत राहिली आहे. आयरा खूप बोल्ड आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होतात. दरम्यान आता स्टार अभिनेत्याच्या मुलीने तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेच्या (Nupur Shikhare) आईची साडी नेसून फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. (Aamir Khan's daughter Ira Khan poses in front of camera in boyfriend's mother's sarees).   

नुपूर आणि आईसोबत आली समोर 

फोटोमध्ये आयरा खान तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखर आणि तिच्या आईसोबत दिसत आहे. तिने खादीची कॉटन साडी आणि लाल ब्लाउज घातला आहे. एका फोटोमध्ये आयरा नुपूरसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे. आयरा उभी आहे आणि नूपुरने तिला मागून दोन्ही हातांनी पकडल्याचे फोटोत दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Ira Khan (@khan.ira)

आयराने नेसली साडी

आयराने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोसोबत लिहले की, "मुंबईची खादी कॉटन साडी. शुभ रविवार या साडीबद्दल प्रीतम शिखरे यांचे आभार." अलीकडेच आयराने तिच्या आईची देखील साडी नेसली होती. तिने कॅप्शनमध्ये लिहले होते की, "साडी अन् रविवार, मला साडी आवडते. मी दर रविवारी साडी नेसायचे ठरवले आहे. काही तासांसाठी. माझ्याकडे फारशा साड्या नाहीत. म्हणूनच मी अनेकांच्या साड्यांवर छापा टाकणार आहे. ही आईची साडी आहे, जी कोलकात्याची आहे."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Ira Khan (@khan.ira)
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Ira Khan (@khan.ira)

रिलेशनशिपबाबत चर्चेत 

आयरा खान आमिर खानची पहिली पत्नी रिना दत्तची मुलगी आहे. आयराचा एक भाऊ जुनैद देखील आहे. आयरा खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ती नुपूर शिखरसोबत अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांनी त्यांचे नाते कधीच लपवले नाही.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी