गोविंदाच्या कारला अपघात, अपघातावेळी मुलगा यशवर्धन चालवत होता गाडी 

झगमगाट
रोहित गोळे
Updated Jun 25, 2020 | 17:08 IST

Govinda son Yashvardhan Car Accident: अभिनेता गोविंदाचा मुलगा यशवर्धन याच्या कारला अपघात झाला आहे. अपघातावेळी स्वत: यशवर्धन हाच कार चालवत होता.

Actor Govinda and his son Yashvardhan Ahuja
अभिनेता गोविंदा आणि त्याचा मुलगा यशवर्धन  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • गोविंदाचा मुलगा यशवर्धन याच्या कारचा अपघात
  • अपघातावेळी यशवर्धन स्वत: चालवत होता गाडी
  • या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही

मुंबई: बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या (Govinda) कारला अपघात झाला आहे. काल (२४ जून) रोजी ही घटना घडली. ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहूजा हा या गाडीत होता. (Car Accident) मिळालेल्या माहितीनुसार, यशवर्धनच त्यावेळी गाडी चालवत होता. असे सांगितले जात आहे की, धडक झालेली कार ही एका प्रोडक्शन हाऊसची असल्याचं समजतं आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, यशवर्धनच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.

या अपघाताबाबत माहिती मिळताच गोविंदा आणि त्याची मुलगी टीना हे घटनास्थळी पोहोचले. या अपघातात यशवर्धनच्या  कारची हेडलाईट फुटली आहे. परंतु, या अपघाताप्रकरणी दोन्ही कार चालकांकडून पोलिसात तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.  दोन्ही बाजूंनी परस्पर संमतीने हे प्रकरण सोडविण्यात आलं आहे.

गोविंदा दोन मुलांचा बाप 

गोविंदाला मुलगी टीना आणि मुलगा यशवर्धन अशी दोन अपत्य आहेत. टीनाने अभिनय क्षेत्रात प्रयत्न करुन पाहिला आहे पण तिला म्हणावं तसं यश मिळालं नाही. २०१५ साली तिने 'सेकंड हँड हसबँड' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ज्यात गिप्पी ग्रेवाल आणि धर्मेंद्र देखील होते. परंतु हा चित्रपट फ्लॉप ठरला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy #diwali

A post shared by Yashvardhan Ahuja (@ahuja_yashvardhan) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

They didn't tell they were colour co-ordinating... #paarivarikhsamasya #lunch with #family ❤

A post shared by Yashvardhan Ahuja (@ahuja_yashvardhan) on

सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असतो गोविंदा 

गोविंदा 80-90 च्या दशकातील टॉप बॉलीवूड कलाकारांपैकी एक आहे. त्यांने आतापर्यंत सुमारे १६५ सिनेमात काम केलं आहे. आता तो बर्‍याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेला आहे. गोविंदा बहुतेकदा इंस्टाग्रामवर स्वतः पोस्ट करत असतो. तिथे त्याचे जवळजवळ ८.५ लाख फॉलोअर्स आहेत.

'हसीना मान जाएगी' सिनेमाला २१ वर्षे पूर्ण

२१ जून १९९९ रोजी गोविंदाचा 'हसीना मान जाएगी' हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात गोविंदाशिवाय संजय दत्त, करिश्मा कपूर आणि पूजा बत्रा हे देखील प्रमुख भूमिकेत होते. त्यांच्या याच चित्रपटाला २१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गोविंदाने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. यावेळी त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, 'ओ यार 21 साल हो गए, मैं क्या बधाई हो.. बधाई हो। बल्ले बल्ले।'

एकेकाळी अनेक सुपर-डुपर हिट सिनेमा देणारा हा अभिनेता आता बॉलिवूडमधून काहीसा बाहेर पडला आहे. कारण मागणील अनेक वर्षात त्याचे फार सिनेमे रिलीज झाले नाहीत. (accident of bollywood actor govindas car son yashvardhan ahuja was driving at the time of the accident)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी