या अभिनेत्यांनी पडद्यावर साकारली श्री शंकराची भूमिका, लोकांकडून मिळाले भरपूर प्रेम

झगमगाट
Updated Mar 11, 2021 | 14:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाशिवरात्रीत महादेवाचा आशीर्वाद आणि कृपा प्राप्त करण्यासाठी लोक त्यांची पूजा व प्रार्थना करतात. महादेवाची कथा आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी पडद्यावर शंकराची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची माहिती आपण घेणार आहोत.

Actors who played Lord Shiva's role on screen and earned a lot fan following
महादेवाची भूमिका केलेले अभिनेते  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • ९० च्या दशकातील 'ओम नमः शिवाय' या मालिकेला मिळाला होता प्रचंड प्रतिसाद
  • 'नीली छत्री वाले'मध्ये महादेवाची भूमिका करणाऱ्य़ा हिमांशू सोनीला मिळाली वेगळी ओळख
  • पडद्यावर शंकराची भूमिका केल्याने या अभिनेत्यांना मिळाली ओळख

महाशिवरात्री: भारत हा एक धार्मिक देश आहे. या समाजात देवावरील श्रद्धेला खूप महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक घरात देवघर असणाऱ्या या देशात लोकांमध्ये भक्तिभाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. त्यामुळे टीव्हीवर देवांच्या मालिका लोक खूप आवडीने बघतात. अशा मालिकांचे चाहते खूप मोठ्या संख्येने असतात. या चित्रपट सृष्टीत धार्मिक मालिकांमध्ये काम करून आपली ओळख निर्माण करणारे आणि दर्शकांच्या मनावर राज्य करणारे अनेक कलाकार आहेत. अशा मालिकांमध्ये महादेवाची भूमिका करून आपली ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.

शंकराच्या भूमिकेतून आपली ओळख निर्माण करणारे १० कलाकार

1. मोहीत रैना

२०१८ मध्ये 'देवों के देव' या मालिकेत मोहित रैना यांनी महादेवाची भूमिका उत्तमरित्या पार पाडली आणि चित्रपट सृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. या त्यांच्या भूमिकेसाठी लोकांनी त्यांना खूप प्रेम दिले. यांना प्रत्यक्ष जीवनातसुद्धा लोक शंकराच्या नावावे हाक मारायचे. त्यामुळे पुढे त्यांना अनेक भूमिका मिळाल्या.  

2. रोहित बख्शी

टीव्ही मालिकांच्या जगात चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाणाऱ्या रोहित बख्शी यांनी 'सिया के राम' या मालिकेत शंकराची भूमिका करत इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली आहे. या त्यांच्या कामामुळे त्यांना इतर मालिकेतही अनेक भूमिका मिळत आहेत.

3. हिमांशु सोनी

'नीली छत्रीवाले' या मालिकेत महादेवाची भूमिका करणाऱ्या हिमांशु सोनीनेसुद्धा लोकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली होती. लोकांनी यांनाही या भूमिकेत खूप पसंत केले.

4. अमित मेहरा

अमित मेहरा सर्वात पहिल्यांदा हनुमानाच्या भूमिकेत पडद्यावर दिसले होते. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या मालिकेत महादेवाची यशस्वी भूमिका साकारली होती. अमित मेहरा हे अभिनयाच्या क्षेत्रात येण्याआधी मॉडेलींग करायचे. शंकराची भूमिका केल्यानंतर ते खतरों के खिलाडीसारख्या मालिकेतही दिसले.

5. गुरमीत चौधरी

गुरमीत चौधरी यांनी इंडस्ट्रीत आपल्या करिअरची सुरुवातच महादेवाच्या भूमिकेने केली होती. ही भूमिका साकारल्यानंतर ते डांस रिऍलिटी शो 'झलक दिखला जा' मध्येही दिसले. 

6. संतोष शुक्ला

टीव्हीवरील 'जय जय शिव शंकर' या मालिकेतून आपली ओळख निर्माण करणाऱ्या संतोष शुक्ला यांना शंकराच्या भूमिकेमुळे पुढे अनेक संधी मिळाल्या. कलर्सवरील रिऍलिटी शो 'बिग बॉस' मध्ये ते स्पर्धकाच्या रूपात दिसले.

7. यशोधन राणा

 'ओम नमः शिवाय' या मालिकेत महादेवाची भूमिका करणाऱ्या यशोधन राणाने यातून इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली. या भूमिकेत लोकांनी त्यांना खूप पसंत केले होते. धिरज कुमार यांनी दिग्दर्शीत केलेली ही मालिका लोकांना खूप आवडली होती. ते आपली कामे सोडून ही मालिका पाहायला बसायचे.

8. सुनील शर्मा

दिग्दर्शक धिरज कुमार यांनी बनवलेल्या 'श्री गणेश' या मालिकेतून सुनील शर्मा यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यात त्यांनी महादेवाची भूमिका पार पाडली होती. तसेच 'जय मॉं वैष्णो देवी'तही त्यांनी शंकराची भूमिका केली आहे.

9. अरुण गोविल

९० च्या दशकातील रामानंद सागर यांच्या 'संपूर्ण रामायण' या लोकप्रिय मालिकेत रामाची भूमिका पार पाडणारे अरुण गोविल आजही लोकांच्या मनावर राज्य करतात. लोक आजही त्यांना श्रीराम म्हणून ओळखतात. या भूमिकेनंतर त्यांनी 'शिव की महिमा' या मालिकेत शंकराची भूमिका पार पाडली होती. याही भूमिकेत लोकांनी त्यांना खूप पसंत केले. 

10.अमर सिंह

९० च्या दशकात जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या अमर सिंह यांनी दिग्दर्शक धिरज कुमार यांच्या 'ओम नमः शिवाय' या मालिकेत महादेवाची भूमिका खूप चांगल्या प्रकारे निभावली होती. लोकांना त्यांचे हे रूप फार आवडले होते. ही मालिका आजही लोकांच्या मनावर राज्य करते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी