Parineeti Chopra - Raghav Chadha: अशी सुरू झाली परिणीतीची प्रेमकहाणी, शूटिंगदरम्यान राघव चड्डासोबत जुळले सूत 

झगमगाट
Updated Apr 02, 2023 | 14:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Parineeti Chopra - Raghav Chadha: सूत्राच्या माहितीनुसार अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चड्डा यांची भेट पंजाबमध्ये झाली होती. परिणीती एका शूटिंगच्या निमित्ताने पंजाबला गेली असता सुरू झाली प्रेमकहाणी.  

अभिनेत्री परिणीती चोप्रा आप नेता राघव चड्डाच्या प्रेमात
Parineeti Chopra - Raghav Chadha  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चड्डा यांची भेट पंजाब मध्ये झाली होती.
  • आप नेता संजीव आरोरा यांनी दोघांना दिलेल्या शुभेच्छांमुळे, या चर्चाना उधाण आले आहे.
  • सिंगर आणि परिणीतीचा सहकलाकार हार्डी संधुने देखील या बातमीला दुजोरा दिला

Parineeti- Raghav love story : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचा नेता राघव चड्डा सध्या एकमेकांच्या नातेसंबंधांवरून खूप चर्चेत आहे. दोघांसंबंधी विविध बातम्या येत आहेत. मुळात, आप नेता संजीव आरोरा यांनी दोघांना दिलेल्या शुभेच्छांमुळे, या चर्चाना उधाण आले आहे. त्यानंतर सिंगर आणि परिणीतीचा सहकलाकार हार्डी संधुने देखील या बातमीला दुजोरा दिला आहे. ( Actress Parineeti Chopra in love with AAP leader Raghav Chadha)

मुळात, सिने प्रेक्षकांसाठी हे सर्व काही अचानक असून, याबद्दल अधिक जाणून घेण्याची प्रचंड इच्छा परिणीतीच्या चाहत्यांना लागली आहे. 

अधिक वाचा : 'या' चुका करणारे आई-वडील आपल्या मुलांचे होतात शत्रू

Parineeti- Raghav यांचे पंजाबमध्ये जडले प्रेम

ईटाइम्स च्या विशेष रिपोर्टनुसार परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा भलेही एकत्र शिकले असले तरी त्यांचे प्रेम हल्लीच जुळले आहे. दोघांची भेट पंजाबमध्ये झाली होती. शूटिंग च्या निमित्ताने परिणीती पंजाबला गेली असता, त्यादरम्यान या दोघांची भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. असे असले तरी, ते एकमेकांना किती वर्ष डेट करत आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र सूत्रांच्या मते, दोघे कमीत कमी 6 महीने रिलेशनशिपमध्ये आहेत. ई टाइमने दिलेल्या माहितीनुसार लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहेत. 

सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार "मिस्टर चड्डा आणि मिस चोप्रा यांनी भलेही एकमेकांच्या नात्यांचा जाहीर खुलासा केला नसला तरी, आप च्या बड्या नेत्याने या दोघांना दिलेल्या शुभेच्छा खूप काही सांगून जात आहे." 

अधिक वाचा : ​केस जास्तच गळतायत? मग रोजच्या या सवयींमध्ये तात्काळ करा बदल

प्रमोशन च्या निमित्ताने प्रियंका चोप्रा आली भारतात

त्यांनी सांगितले की, "परिणीती च चुलत बहीण प्रियंका चोप्रा आपल्या आगामी प्रोजेक्ट च्या प्रमोशनसाठी मुंबईत 'सिटाडेल' ला आली आहे. ती परिणीतीला भेटणार आहे, मात्र राघवचीदेखील ती गाठ घेईल की नाही हे माहीत नाही." 

तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, 31 मार्चला प्रियंका चोप्रा आपला पती निक जॉनस आणि संपूर्ण कुटुंबासोबत भारतात आली आहे. प्रियंकाच्या येण्यामुळे परिणीती आणि राघवच्या लग्नाच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत. मात्र, त्यांच्या लग्नाची अधिकृत खबर अजून तरी जाहीर करण्यात आलेली नाही.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी