तेजस्विनी पंडितनं नवरात्रीनिमित्त केलेल्या फोटोशूटमधील तृतीया, चतुर्थी आणि पंचमीची रुपं पाहिलीत का?

झगमगाट
Updated Oct 03, 2019 | 14:03 IST | चित्राली चोगले

अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा नवरात्रीसाठी खास फोटोशूट केलंय. यंदाचं तिचं फोटोशूट खुप वेगळं असून त्याच्याबद्दल सध्या बरीच चर्चा रंगली आहे. पाहा तिने नुकतीच परिधान केलेली रुपं.

actress tejaswini pandit creates devi avatars for navratri special photo shoot look at her day 3 4 and 5 looks
अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या नवरात्रीनिमित्त फोटोशूटमधील तृतीया, चतुर्थी आणि पंचमीची रुपं पाहिलीत का?  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट
  • पहिल्या दोन दिवसांनंतर तृतीया, चतुर्थी आणि पंचमीची रुपांना देखील पसंती
  • फोटोंसोबत गहन विषयावर झाली व्यक्त

मुंबई: अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं गेल्यावर्षी प्रमाणे यंदा सुद्धा नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट करण्याचं ठरवलं आणि ते नक्कीच सगळ्यांच्या पसंतीस उतरलं आहे. प्रत्येक दिवशी तिच्या नवीन लूकची उत्सुकता अनेकांना लागलेली असते. त्याप्रमाणे तिच्या या प्रत्येक दिवसाच्या देवीच्या रुपासोबत उत्सुकता असते ते त्या दिवशी ती कोणत्या गहन विषयाला हात घालणार याची. पहिल्या दोन दिवशी कोल्हापूरची पूरपरिस्थिती आणि बलात्कार या विषयावर तिने दोन देवींच्या रुपांसोबत भाष्य केलं. आता तृतीया, चतुर्थी आणि पंचमीसाठी ती कोणत्या अवतारात अवतरली आहे चला पाहुयात.

पहिल्या दिवशी कोल्हापूरची अंबाबाई आणि दुसऱ्या दिवशी कामाख्या देवीचं रुप धारण केल्यानंतर तृतीयासाठी तेजस्विनी जरीमरी आईच्या रुपात अवतरली. जरीमरी आईच्या रुपातला फोटो पोस्ट करत तिने त्यावर समद्राच्या पर्यावरणाचा विषय हाताळला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

तृतीय " जरीमरी आई" . . माझ्या तळाशी असलेलं सारं काही तुला पाहता येतं ते बळजबरीने ओरबाडून ही घेता येतं, पण तुझ्या मनात काय सुरु आहे हे मात्र मला कळत नाही. कधी काळी मोती शंख शिंपल्यांनी उजळून जायचा माझा आसमंत .पण आता माझे अलंकार झालेत प्लास्टिक च्या पिशव्या , अर्धवट विरघळलेलया मूर्त्या, दारूच्या बाटल्या आणि घुसमटून मेलेले माझ्याच उदरातले जलचर. पहिल्यांदा माझ्या लाटांवर स्वार झाला होतास तेव्हा वाटलं नव्हतं माझी अशी फसवणूक करशील म्हणून... असं म्हणतात पेरिले तैसे उगवते बोलण्यासारखे उत्तर येते आता तुझ्या या वागण्याचं कसं प्रत्युत्तर देऊ मी...माझ्या लाटांनी तुझं जीवन कसं समृद्ध करू मी ? . . Concept & Director : @dhairya_insta_ Photographer : @bharatpawarphotography Digital art by : @amol.hirawadekar @imvishalshinde @thenameisabhishekk Asst. Dir : @shraddha_kakade Jewellery by : @pngadgilandsons Makeup : @vinodsarode Hair : @sheetalpalsande Styled by : @stylistnakshu @saniyacool @pottering.vels Costumes By : @official_dadfashionstudio PR & Social Media By : @dreamers_pr Special Thanks: @rjadhishh #navratri #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

हा फोटो शेअर करत ती म्हणते,

तृतीय " जरीमरी आई"

माझ्या तळाशी असलेलं सारं काही तुला पाहता येतं ते बळजबरीने ओरबाडून ही घेता येतं, पण तुझ्या मनात काय सुरु आहे हे मात्र मला कळत नाही. कधी काळी मोती शंख शिंपल्यांनी उजळून जायचा माझा आसमंत .पण आता माझे अलंकार झालेत प्लास्टिक च्या पिशव्या, अर्धवट विरघळलेलया मूर्त्या, दारूच्या बाटल्या आणि घुसमटून मेलेले माझ्याच उदरातले जलचर. पहिल्यांदा माझ्या लाटांवर स्वार झाला होतास तेव्हा वाटलं नव्हतं माझी अशी फसवणूक करशील म्हणून... असं म्हणतात पेरिले तैसे उगवते बोलण्यासारखे उत्तर येते आता तुझ्या या वागण्याचं कसं प्रत्युत्तर देऊ मी... माझ्या लाटांनी तुझं जीवन कसं समृद्ध करू मी?

तिच्या या पोस्टला ४३ हजारांच्यावर लाईक्स तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मिळाले आहेत. त्यानंतर तिने चतुर्थीला महालक्ष्मी मातेचं रुप परिधान केलं. त्यावर तिने काळापैसा आणि गैरव्यवहारांबद्दल भाष्य केलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

चतुर्थी "महालक्ष्मी" . . कराग्रे वसते लक्ष्मी...अर्थात तुझ्या हातात माझा निवास आहे. संपत्तीचं सर्वात मोठं माझं वरदान मी तुझ्या हाती दिलं....पण तू मात्र त्याची राखरांगोळी केलीस...स्वतः ची तिजोरी अधिकाधिक भरण्यासाठी तुझी राक्षसी चढाओढ सुरू झाली. मी सतत ‘फिरती’ राहणे हा माझा निसर्ग! मला डांबून ठेवून आयुष्य समृद्ध करणारं हे धन तू "काळं धन" करून अनेकांचा काळ ओढवला आहेस. तुझं हे लोभी रूप पाहुन मन माझं पिळवटून गेलंय..... माझ्या सोनसळी वरदाना च तू तुझ्या हातांनीच मातेरं केल आहेस...तूच मातेरं केल आहेस ! . . Concept & Director : @dhairya_insta_ Photographer : @bharatpawarphotography Digital art by : @amol.hirawadekar @imvishalshinde @thenameisabhishekk Asst. Dir : @shraddha_kakade Jewellery by : @pngadgilandsons Makeup : @vinodsarode Hair : @sheetalpalsande Styled by : @stylistnakshu @saniyacool @pottering.vels Costumes By : @official_dadfashionstudio PR & Social Media By : @dreamers_pr Special Thanks : @rjadhishh #navratri #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

 

या पोस्टसोबत तेजस्विनीने लिहीलं आहे,

चतुर्थी "महालक्ष्मी"

कराग्रे वसते लक्ष्मी... अर्थात तुझ्या हातात माझा निवास आहे. संपत्तीचं सर्वात मोठं माझं वरदान मी तुझ्या हाती दिलं....पण तू मात्र त्याची राखरांगोळी केलीस. ..स्वतःची तिजोरी अधिकाधिक भरण्यासाठी तुझी राक्षसी चढाओढ सुरू झाली. मी सतत ‘फिरती’ राहणे हा माझा निसर्ग! मला डांबून ठेवून आयुष्य समृद्ध करणारं हे धन तू "काळं धन" करून अनेकांचा काळ ओढवला आहेस. तुझं हे लोभी रूप पाहुन मन माझं पिळवटून गेलंय... माझ्या सोनसळी वरदानाचं तू तुझ्या हातांनीच मातेरं केल आहेस... तूच मातेरं केल आहेस!

हा लूक सुद्धा प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. तिच्या या लूकला तिच्या इंस्टावर ३३ हजारांच्या वर लाईक्स आले आहेत. तसंच आजच्या दिवशी म्हणजेज पंचमीसाठी ती शेरावाली माँच्या रुपात अवतरली आहे आणि आजचा तिचा विषय आहे निसर्गाचं संवर्धन.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पंचमी " शेरावाली माता" . . वाजत गाजत आणलस खरं मला..बसवणार कुठे? कुठे आहे माझं वाहन? कशावर आरूढ होणार मी? तुझ्या अस्त्वित्वाचा पसारा वाढवताना तू माझ्या दुसऱ्या लेकाचा आसरा नष्ट केलास. त्याच्या कातडी साठी त्याच्या नखांसाठी त्याचा जीव घेतलास? अरे वेड्या तू त्याचे अस्तित्व संपवत नाहीयेस फक्त ...तुझेही संपवतोयस. अन्न साखळी विसरलास? ‘परस्पर-पूरकता’ विसरलास? समतोल ढासळलाय......माझ्या डोळ्यांदेखत मी उभारलेली सृष्टी मला विनाश होताना दिसतेय....मी हतबल आहे...माझ्या हाती शस्त्र आहेत पण त्यांचा वापर करून तुमची हि वृत्ती मी कशी घालवणार? . . Concept & Director : @dhairya_insta_ Photographer : @bharatpawarphotography Digital art by : @amol.hirawadekar @imvishalshinde @thenameisabhishekk Asst. Dir : @shraddha_kakade Jewellery by : @pngadgilandsons Makeup : @vinodsarode Hair : @sheetalpalsande Styled by : @stylistnakshu @saniyacool @pottering.vels Costumes By : @official_dadfashionstudio PR & Social Media By : @dreamers_pr Special Thanks : @jyotsnapethkar #navratri #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

 

हा फोटो पोस्ट करत तिने कॅप्शन दिलं आहे.

पंचमी " शेरावाली माता"

वाजत गाजत आणलस खरं मला..बसवणार कुठे? कुठे आहे माझं वाहन? कशावर आरूढ होणार मी?

तुझ्या अस्त्वित्वाचा पसारा वाढवताना तू माझ्या दुसऱ्या लेकाचा आसरा नष्ट केलास. त्याच्या कातडीसाठी त्याच्या नखांसाठी त्याचा जीव घेतलास? अरे वेड्या तू त्याचे अस्तित्व संपवत नाहीयेस फक्त... तुझेही संपवतोयस. अन्न साखळी विसरलास? ‘परस्पर-पूरकता’ विसरलास? समतोल ढासळलाय... माझ्या डोळ्यांदेखत मी उभारलेली सृष्टी मला विनाश होताना दिसतेय... मी हतबल आहे... माझ्या हाती शस्त्र आहेत पण त्यांचा वापर करून तुमची ही वृत्ती मी कशी घालवणार?

या लूकला पोस्ट करुन अवघे काही तास उलटले असले तरी त्याला जवळपास १४ हजारांच्या घरात लाईक्स मिळाले आहेत आणि ते वाढतंच चालले आहेत. तिच्या या आगळ्या-वेगळ्या फोटोशूटमध्ये आता पुढची रुपं कोणती असणार आणि ती कोणत्या विषयाबद्दल बोलणार त्याकडे निश्चितंच लक्ष लागलेलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी