Nitish Bhardwaj Update : नवी दिल्ली : सुप्रसिद्ध अभिनेते नितीश भारद्वाज (Actor Nitish Bhardwaj)यांना मोठा धक्का बसला आहे. दूरदर्शनवरील प्रचंड लोकप्रिय मालिका असलेल्या 'महाभारत'मध्ये (Mahabharat) भगवान कृष्णाची (Krishna)भूमिका साकारून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारा अभिनेता नितीश भारद्वाज यांचा घटस्फोट (Divorce) झाला आहे. ते आपली पत्नी स्मिता गटेपासून विभक्त झाले आहेत. स्मिता या व्यवसायाने आयएएस अधिकारी आहेत. त्यांना दोन जुळ्या मुली आहेत. त्या इंदूरमध्ये स्मितासोबत राहतात. दोघांनी २०१९ मध्ये घटस्फोटाची केस दाखल केली होती. आपल्या अभिनयामुळे आणि साकारलेल्या भूमिकेमुळे नितीश यांना मोठी लोकप्रिय मिळाली होती. (After 12 years Nitish Bhardwaj faces second divorce)
नितीश आणि स्मिता यांचे २००९ मध्ये लग्न झाले आणि दोघांना दोन मुली आहेत. नितीश यांनी अलीकडेच बॉम्बे टाईम्सशी संवाद साधला आणि सांगितले, 'होय, मी सप्टेंबर २०१९ मध्ये मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आम्ही का वेगळे झालो याच्या कारणांबद्दल मला बोलायचे नाही. हे प्रकरण अजूनही न्यायालयात आहे. मी एवढेच म्हणू शकतो की कधी कधी घटस्फोट मृत्यूपेक्षाही अधिक वेदनादायक असू शकतो.' नितीश आणि स्मिता या दोघांचे हे दुसरे लग्न असल्याची माहिती आहे.
लग्नाबाबत बोलताना नितीश म्हणाले की, त्यांचा लग्नावर विश्वास आहे पण या बाबतीत त्यांचे नशीब चांगले नव्हते. नितीश पुढे म्हणाले, 'सर्वसाधारणपणे लग्न तुटण्याची अनंत कारणे असू शकतात, काहीवेळा यामागे अहंकार आणि स्वकेंद्रित विचारसरणीचा परिणाम असू शकतो. पण जेव्हा कुटुंब तुटते तेव्हा सगळ्यात जास्त त्रास मुलांना होतो. त्यामुळे मुलांवर याचा कमीत कमी नकारात्मक परिणाम होईल याची काळजी घेणे ही पालकांची जबाबदारी आहे.
स्मिताच्या आधी नितीश भारद्वाज यांनी १९९१ मध्ये मोनिषा पाटीलसोबत लग्न केले आणि दोघांना दोन मुले झाली. एक मुलगी आणि एक मुलगा पण दुर्दैवाने दोघांचा २००५ मध्ये घटस्फोट झाला होता. यानंतर आता पुन्हा एकदा नितीश भारद्वाज यांना घटस्फोटाचा धक्का बसला आहे.
तामिळ चित्रपटांचा सुप्रसिद्ध सिनेस्टार आणि नुकताच 'अतरंगी रे' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता धनुषने त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांतपासून विभक्त झाल्याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. धनुषने पोस्टमध्ये लिहीलं आहे, "१८ वर्षांचा सहवास, मैत्री, एक चांगले कपल होणे, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक, आमची ग्रोथ, समजूतदारपणाचा, एकत्र प्रवास आम्ही केला. मात्र, आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यावर आज, आम्ही जिथे उभे आहोत तिथून आमचे मार्ग वेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. एकमेकांपासून वेगळे होऊन आम्ही स्वत:ला शोधण्याचानिर्णय घेतला आहे. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमची प्रायव्हसी लक्षात घेऊन आम्हाला आमच्या या निर्णयाशी डील करू द्या"