आमिरनंतर अनिल कपूरही होणार पत्नीपासून विभक्त, ३० वर्षांनी लहान या अभिनेत्रीशी करणार लग्न ?

Anil Kapoor will marry young actress : हा अभिनेता त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या शरीरयष्टीसाठीही खूप लोकप्रिय आहे. प्रत्येकाला त्याच्या भिनेत्याच्या फिटनेसचे रहस्य जाणून घ्यायचे असते. आमिरनंतर आता अनिल कपूरही चर्चेत आला आहे. तो त्याच्या पत्नीपासून विभक्त, त्यानंतर त्याच्यापेक्षा ३० वर्षे अभिनेत्रीशी दुसऱ्यांदा लग्न करणार, अशी चर्चा आहे.

After Aamir, Anil Kapoor will also be separated from his wife, will he marry this young actress after 30 years?
आमिरनंतर अनिल कपूरही होणार पत्नीपासून विभक्त, ३० वर्षांनी लहान या अभिनेत्रीशी करणार लग्न ?  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • आमिरनंतर आता अनिल कपूरही चर्चेत आला आहे
  • तो त्याच्या पत्नीपासून विभक्त होणार
  • ३० वर्षीय अभिनेत्रीशी करणार दुसऱ्यांदा लग्न आहे

मुंबई : बॉलीवूड स्टार अनिल कपूर (anil kapoor) त्याच्या फिटनेसमुळे (fitness) नेहमी चर्चेत असतो. अनेक दशकांपासून या अभिनेत्याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. या अभिनेत्याने आपल्या आयुष्यातील 38 महत्त्वाची वर्षे चित्रपटसृष्टीला दिली आहेत. अनिल कपूर हा असाच एक कलाकार आहे, ज्यांच्यावर आजही मुली मरतात. प्रत्येक मुलीला अनिलच्या तारुण्याचे रहस्य जाणून घ्यायचे असते. (After Aamir, Anil Kapoor will also be separated from his wife, will he marry this young actress after 30 years?)

तरुण दिसण्यासाठी अनिलचा फाॅर्मुला

अनिल कपूरच्या फिटनेसच्या गुपिताबद्दल बाहेर अनेक अफवा सुरू आहेत. काही म्हणतात की ते तंदुरुस्त राहण्यासाठी सापाचे रक्त पितात, तर काही म्हणतात की अनिल कपूर यांची प्लास्टिक सर्जरी झाली आहे. अभिनेता अनिल कपूर नुकताच अरबाज खानच्या लोकप्रिय शो पिंचमध्ये पोहोचला. शोमध्ये अरबाजने अभिनेत्याला त्याच्या फिटनेसचे रहस्य विचारले, तेव्हा अनिल कपूर म्हणाला की तो तरुण दिसण्यासाठी काही करत नाही. तो म्हणाला की, प्रत्येक मानवाने आपल्या चोवीस तासांपैकी थोडा वेळ देवासाठी काढला पाहिजे. या उत्तराने अनिल त्या लोकांची तोंडे बंद केले की ते म्हणायचे अनिल कपूर तरुण दिसण्यासाठी सापाचे रक्त पितात.

तिच्यासाठी पत्नीला सोडणार

तसेच अलीकडे ही अफवाही वेगाने पसरत आहे की अनिल कपूर आपल्या पत्नीला घटस्फोट देणार आहे. त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या कलाकारासोबत तो लग्न करणार असल्याचंही बोललं जात आहे. अनिल कपूर करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये पोहोचला होता, जिथे त्याला विचारण्यात आले होते की, जर तुम्हाला एका अभिनेत्रीसाठी पत्नीला सोडावे लागले तर तुम्ही कोणती अभिनेत्री निवडाल. त्यानंतर अनिल कपूरने कंगना राणावतकडे बोट दाखवले. लोकांनी अनिलच्या या विनोदाला खूप गांभीर्याने घेतले आणि अशा गोष्टी घडू लागल्या की तो आपल्या पत्नीला घटस्फोट देणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी