मालिकेतून बाहेर पडल्यानंतर किरण मानेला सिनेमाची ऑफर, 'मुलगी झाली हो' मध्ये हा अभिनेता दिसणार विलासच्या भूमिकेत

मुलगी झाली हो मालिकेतून अभिनेता किरण मानेंना काढल्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. आता मालिकेत त्यांची जागा एक मराठीतील लोकप्रिय अभिनेता घेणार आहे. तर किरण माने यांना एका चित्रपटाबाबत विचारणा झाली आहे.

After leaving the series, Kiran Mane is offered a movie, the actor will be seen in the role of Vilas in 'Mulgi Zhali Ho'.
मालिकेतून बाहेर पडल्यानंतर किरण मानेला सिनेमाची ऑफर, 'मुलगी झाली हो' मध्ये हा अभिनेता दिसणार विलासच्या भूमिकेत  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अभिनेता किरण माने याला बाहेर काढल्यानंतर बराच वाद निर्माण झाला
  • मुलगी झाली हो' मालिकेत विलास पाटीलच्या भूमिकेत अभिनेता आनंद अलकुंटे दिसणार
  • किरण माने यांना मराठी चित्रपटाची आॅफर

मुंबई  : स्टार प्रवाह चॅनेलवरील 'मुलगी झाली हो' मालिकेतून अभिनेता किरण माने याला बाहेर काढल्यानंतर बराच वाद निर्माण झाला होता. दरम्यान, मालिकेतील विलास पाटील या पात्राची भूमिका अभिनेता आनंद अलकुंटे साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे अभिनेता किरण माने यांनी नवी फेसबुक पोस्ट करत मालिकेतून काढल्यानंतर 'रावरंभा' (ravrambha ) या चित्रपटासाठी विचारणा झाली असून सध्या याचे चित्रीकरण सुरु असल्याचा माहिती दिली आहे. (After leaving the series, Kiran Mane is offered a movie, the actor will be seen in the role of Vilas in 'Mulgi Zhali Ho'.)

काही दिवसांपूर्वी अभिनेता किरण माने यांनी राजकीय भूमिकेमुळे मला चॅनेलने 'मुलगी झाली हो' मधून काढलं, असा आरोप केला होता. त्यावर स्टार प्रवाहने सांगितले की, प्रॉडक्शन हाऊसने पुष्टी केली आहे की श्री माने यांना शोमधून काढून टाकण्याचा निर्णय शोमधील अनेक सह-कलाकारांसह, विशेषत: शोच्या महिला नायकाशी केलेल्या गैरवर्तनामुळे झाला होता. “त्यांच्या सहकलाकार, दिग्दर्शक आणि शोच्या इतर युनिट सदस्यांकडून गैरवागणुकीबद्दल अनेक तक्रारी केल्या गेल्या. माने यांना अनेक इशारे देऊनही, त्यांनी शोच्या सेटवर मूळ शालीनता आणि शिष्टाचाराचे उल्लंघन करून तशाच प्रकारे वागणे सुरू ठेवले,” असे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, या मालिकेत अभिनेता आनंद अलकुंटे या शोमध्ये मानेच्या जागी विकास पाटीलची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. मात्र, प्रोडक्शन हाऊसकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 दुसरीकडे किरण माने यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत मालिकेतून काढल्यानंतर 'रावरंभा' (ravrambha )या चित्रपटासाठी विचारणा झाली असून सध्या याचे चित्रीकरण सुरु असल्याचा माहिती दिली आहे.

किरण माने यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, आनंद वो...निव्वळ आनंद... नविन भन्नाट जबराट नादखुळा भुमिका ! सोबत प्रतिभावानांची टीम !! आपन वास्तवात ज्या विचारधारेची 'भुमिका' घेत असतो...लढत असतो..त्याचवेळी मोठ्या पडद्यावरबी त्याच विचाराचा धागा असनारी 'भुमिका' मिळावी, यासारखं दूसरं समाधान नाय भावांनो !!!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी