Aryan Khan Club Video: NCB च्या क्लीन चीटनंतर आर्यन खान सुसाट, क्लबमधला 'तो' व्हिडिओ व्हायरल

झगमगाट
पूजा विचारे
Updated Jul 20, 2022 | 14:02 IST

Aryan Khan Viral Video: काही दिवसांपूर्वी आर्यन खानला NCB नं या प्रकरणात क्लीन चीट दिली. क्लीन चीट मिळाल्यानंतर आर्यन खानचा पासपोर्टही परत करण्यात आला.

Aryan Khan
आर्यन खान 
थोडं पण कामाचं
  • आर्यन खानला (Aryan Khan) नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून (Narcotics Control Bureau) अटक करण्यात आली होती.
  • आर्यन खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • या व्हायरल व्हिडिओत आर्यन त्याच्या मित्रांसोबत एका क्लबमध्ये पार्टी करताना दिसतोय.

मुंबई:  Aryan Khan News: गेल्या वर्षी ड्रग्ज क्रूझ प्रकरणात बॉलिवूड स्टार शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून (Narcotics Control Bureau) अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी आर्यन खानला NCB नं या प्रकरणात क्लीन चीट दिली. क्लीन चीट मिळाल्यानंतर आर्यन खानचा पासपोर्टही परत करण्यात आला. अशा परिस्थितीत आर्यन खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत आर्यन त्याच्या मित्रांसोबत एका क्लबमध्ये पार्टी करताना दिसतोय. (Shah Rukh Khan Son Aryan Khan Video)

क्लबमध्ये पार्टी करत होता आर्यन खान 

आर्यन खान हा असा स्टार किड्सपैकी आहे जो नेहमीच चर्चेत असतो. शाहरूख खान आणि आर्यन खानच्या चाहत्यांना त्याच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी जाणून घेण्यात रस असतो. NCB कडून क्लीनचीट मिळाल्यानंतर आर्यन खाननं वर्षभरानंतर सुटकेचा निःश्वास सोडला. यानंतर आर्यन खान आपल्या नॉर्मल आयुष्यात परत येत असल्याचं दिसून येतंय. आर्यन त्याच्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी क्लबमध्ये पोहोचला. त्यांचा क्लबमध्ये पार्टी करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका फॅन क्लबने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये आर्यन खान आपल्या मित्रांसोबत क्लबमध्ये क्वालिटी टाइम घालवत आहे. इतकंच नाही तर आर्यन यामध्ये मित्रांसोबत ड्रिंक्सचा आनंद घेतोय. त्याच्या या व्हिडिओवर चाहते सतत प्रतिक्रिया देत आहेत.

अधिक वाचा-  पटकन वजन कमी करायचं आहे?, मग आजपासूनच डाएटमध्ये समावेश करा किचनमधल्या 'या' महत्त्वाच्या भाजीचा

करिअरकडे लक्ष देतोय आर्यन खान

आर्यन खानच्या या व्हायरल व्हिडिओवर शाहरुख खान आणि त्याचे चाहते लाइक्सचा वर्षाव करत आहेत. आर्यन त्याचं आयुष्य पुन्हा रुळावर आणण्यासाठी वर्कफ्रंटवर लक्ष देत आहे. तो लवकरच रेड चिलीज एंटरटेनमेंट निर्मित वेब सिरीज दिग्दर्शित करताना दिसेल. यासोबतच आर्यननं अॅमेझॉन प्राइम व्हिडिओला शोसाठी त्याची स्क्रिप्टही पाठवली असल्याची माहिती मिळतेय. ज्यावर आर्यन काम करत आहे. खरंतर आर्यन खानला वडिलांप्रमाणे पडद्यावर काम करण्याऐवजी पडद्यामागे काम करायची इच्छा आहे. त्यामुळे लेखन आणि दिग्दर्शनात आपले करिअर घडवायचे आर्यननं ठरवले आहे.

 किंग खान 'डंकी'च्या शूटिंगमध्ये बिझी 
 
शाहरूख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो अनेक सिनेमांमध्ये सतत काम करताना दिसणार आहे. मात्र तो सध्या लंडनमध्ये त्याच्या आगामी 'डंकी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी