Naga Chaitanya:समंथाशी घटस्फोटानंतर नागा चैतन्यला मिळालं नवं प्रेम! ‘या’ अभिनेत्रीचं नाव घेताच चेहऱ्यावर फुललं हसू

झगमगाट
पूजा विचारे
Updated Aug 03, 2022 | 17:33 IST

Naga Chaitanya's Found New Love:आता नागा चैतन्य पुन्हा एकदा प्रेमात पडला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नागाला नवीन प्रेम मिळाल्याची बातमी समोर आली.

Naga Chaitanya
सामंथापासून घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्यला नवे प्रेम  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • समंथा आणि नागा यांनी लाखो चाहत्यांना मोठा धक्का दिला.
  • दक्षिण अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा प्रभू ऑक्टोबर 2021 मध्ये दोघं एकमेकांपासून वेगळे झाले.
  • आता नागा चैतन्य पुन्हा एकदा प्रेमात पडला असल्याची चर्चा सुरु झाली.

मुंबई: Naga Chaitanya's Response To Rumoured Girlfriend Sobhita Dhulipala: टॉलिवूडचे सर्वात प्रसिद्ध कपल समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांनी 2017 मध्ये लग्न केले आणि त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. सर्व काही ठीक चाललं होतं आणि मीडिया या कपलच्या पहिल्या गरोदरपणाच्या बातम्या देत होता. मात्र त्यांनंतर समंथा आणि नागा यांनी लाखो चाहत्यांना मोठा धक्का दिला. दक्षिण अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा प्रभू ऑक्टोबर 2021 मध्ये दोघं एकमेकांपासून वेगळे झाले. या कपलनं आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली होती. मात्र यानंतर आता नागा चैतन्य पुन्हा एकदा प्रेमात पडला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नागाला नवीन प्रेम मिळाल्याची बातमी समोर आली.

नागा चैतन्यच्या आयुष्यात आता एक नवी व्यक्ती आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता सध्या अभिनेत्री शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala)  डेट करत आहे. आपल्या अफेअरच्या चर्चेवर एका मुलाखतीदरम्यान नागाने शिक्कामोर्तब केलं आहे. 

अधिक वाचा-  मुंबईकरांनो काळजी घ्या, स्वाइन फ्लू आणि मलेरियाचा वाढतोय कहर

रिपोर्टमध्ये करण्यात आला दावा 

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान नागा चैतन्यने त्याच्या आणि शोभिताच्या नात्याची पुष्टी केली होती. मुलाखतीदरम्यान जेव्हा या अभिनेत्रीचे नाव समोर आले तेव्हा नागाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मात्र हे प्रकरणावर बोलणं टाळत त्यानं हा प्रश्न फक्त हसण्यावारी घेतला. 

दरम्यान, एक महिन्यापूर्वी दुसऱ्या एका रिपोर्टमध्ये नागा शोभितासोबत त्याच्या नवीन घरी एकत्र दिसल्याचं म्हटलं होतं. रिपोर्टमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, दोघे एकमेकांसोबत कम्फर्टेबल वावरताना दिसले.

नागा चैतन्य बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास तयार

'लाल सिंग चड्ढा' हे (Lal Singh Chaddha) अद्वैत चंदन दिग्दर्शित आहे आणि त्यात आमिर खान, करीना कपूर खान आणि मोना सिंग (Aamir Khan, Kareena Kapoor Khan) यांच्यासोबत नागा चैतन्य देखील आहे. नागा याचा हा पहिला बॉलिवूड सिनेमा आहे. या सिनेमात तो एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या सिनेमाद्वारे तो चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार आहे. हा सिनेमा 11 ऑगस्ट 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा सिनेमा टॉम हँक्स स्टारर 'फॉरेस्ट गंप'चा अधिकृत रिमेक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी