ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा आई होणार?, विमानतळावर स्पॉट होताच लपवताना दिसली बेबी बंप

झगमगाट
पूजा विचारे
Updated Jul 19, 2022 | 16:31 IST

सध्या सोशल मीडियावर (social media) बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Bollywood actress Aishwarya Rai Bachchan) ट्रेडिंगमध्ये आहे.

Aishwarya Rai Bachchan
ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा आई होणार?, विमानतळावर स्पॉट होताच लपवताना दिसली बेबी बंप 
थोडं पण कामाचं
  • अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या पोन्नियिन सेल्वन (Ponniyin Selvan) या सिनेमामुळे चर्चेत आहे.
  • अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीची बातमी आल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे.
  • ऐश्वर्याचा एअरपोर्ट लूक पाहिल्यानंतर प्रेग्नेंसीच्या बातम्यांनी जोर धरला आहे.

मुंबई: सध्या सोशल मीडियावर (social media)  बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Bollywood actress Aishwarya Rai Bachchan) ट्रेडिंगमध्ये आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या राय बच्चन बरीच चर्चेत आहे. एकीकडे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या पोन्नियिन सेल्वन (Ponniyin Selvan) या सिनेमामुळे तर दुसरीकडे तिच्या प्रेग्नन्सीमुळे (Pregnancy) सतत चर्चेत आहे. अभिनेत्री प्रेग्नंट (Pregnant) असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीची बातमी आल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. पण चाहत्यांना हे जाणून घ्यायचं आहे की, अभिनेत्री खरोखर प्रेग्नंट आहे की नाही?. 

अभिनेत्री प्रेग्नंट असल्याच्या चर्चांवर ऐश्वर्या राय बच्चन किंवा तिचा पती अभिनेता अभिषेक बच्चन यांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पण असताना ऐश्वर्याचा एअरपोर्ट लूक पाहिल्यानंतर प्रेग्नेंसीच्या बातम्यांनी जोर धरला आहे. 

अधिक वाचा-  Kidney Damage Habits: 'या' 5 चुका सुधारा, कधीच फेल होणार नाही Kidney

अलीकडेच, पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांच्यासह, अभिनेत्री मुंबई विमानतळावर स्पॉट झाली आहे. यावेळी ती तिच्या लांब कोटनं वारंवार पोट लपवाताना दिसत आहे.

यावेळी ऐश्वर्या राय बच्चनने काळ्या रंगाचा लांब कोट घातला होता. तर आराध्या ब्लॅक आणि अभिषेक ग्रे-लाइट पिंक कलरच्या ट्रॅकसूटमध्ये दिसले होते. तिघांच्याही तोंडावर मास्क होते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा ऐश्वर्या रायच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याची चर्चा सर्व सोशल मीडिया यूजर्स करत आहेत.

तसंच ऐश्वर्याचे लूज फिटिंग कपडे आणि तिच्या चालण्याची स्टाईल पाहिल्यावर लोकं तर्कवितर्क लावत आहे. तर कमेंट सेक्शनमधील लोकांनी असे म्हटले आहे की, बच्चन कुटुंबातील सून तिचा बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत आहे. जरी आमचे चॅनेल अद्याप याची पुष्टी करत नाही. ऐश्वर्या राय बच्चन  (Aishwarya Rai Bachchan) अभिषेक आणि आराध्या सुट्टीसाठी न्यूयॉर्क गेले होते. न्यूयॉर्कहून परत येत असताना मुंबई विमानतळावर या तिघांना स्पॉट करण्यात आलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी