मुंबई : बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि कन्नड अभिनेता किच्चा सुदीप राष्ट्रभाषेवरून आमने-सामने आले आहेत. किच्छा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजयने सडेतोड उत्तर दिले आहे.
अधिक वाचा :
'RRR' आणि 'KGF Chapter 2' च्या शानदार यशानंतर, कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप एका कार्यक्रमात पॅन इंडियन चित्रपटांबद्दल बोलला आणि म्हणाला, "हिंदी आता राष्ट्रभाषा नाही." यावर अजयने किचाच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आहे. हिंदीत लिहिलेल्या ट्विटमध्ये त्यांनी विचारले की, जर हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही तर सुदीप हिंदीत डब करून त्याचे चित्रपट का रिलीज करतो?
अजय देवगणने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “किच्चा सुदीप माझा भाऊ, तुमच्या मते जर हिंदी आमची राष्ट्रभाषा नाही तर तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का रिलीज करता? हिंदी ही आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि राहील. जन गण मन." अजयच्या या ट्विटवर किचा यांनीही आपले स्पष्टीकरण दिले आहे.
किच्चा सुदीप Vs अजय देवगणने अजय देवगणच्या ट्विटला उत्तर देताना लिहिले, “सर, मला देशातील प्रत्येक भाषेवर प्रेम आणि आदर आहे. मला हा विषय इथेच संपवायचा आहे. मी म्हटल्याप्रमाणे या ओळी पूर्णपणे संदर्भाबाहेर आहेत. तुझ्यावर नेहमी प्रेम करतो आणि तुला शुभेच्छा देतो. मला अशा आहे कि परत लवकरच भेटूया."
अधिक वाचा :
किच्चा सुदीप एवढ्यावरच थांबला नाही, त्याने पुढच्या ट्विटमध्ये लिहिले, "नमस्कार अजय देवगण सर... आशा आहे की हे तुमच्यापर्यंत पोहोचले असेल की मी जी ओळ बोलली ती पूर्णपणे वेगळी आहे. मी असे विधान का केले यावर आपण भेटल्यावर वैयक्तिक चर्चा केली जाईल. दुखावण्याचा, चिथावणी देण्यासाठी किंवा वाद सुरू करण्याचा हेतू नव्हता. मी हे का करू सर?"
अधिक वाचा :
अजय देवगण (Ajay Devgn React) अजय देवगणनेही किचा सुदीपच्या या ट्विटवर प्रतिक्रिया दिली. त्याने लिहिले, “हाय किच्चा, तू मित्र आहेस. गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद. मी नेहमीच फिल्म इंडस्ट्री एक मानली आहे. आम्ही सर्व भाषांचा आदर करतो. कदाचित अनुवादात काहीतरी चुकले असावे.