Brahmāstra Teaser : ब्रह्मास्त्रचा टीझर प्रदर्शित, या तारखेला ट्रेलर होणार रिलीज 

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा एक टीझर नुकताच लॉन्च झाला आहे. टीझरमध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जून, मौनी रॉय अशी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले असून करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

brahmastra
ब्रह्मास्त्र   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा एक टीझर नुकताच लॉन्च झाला आहे.
  • टीझरमध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जून, मौनी रॉय अशी स्टारकास्ट आहे.
  • या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले असून करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Brahmastra : मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा एक टीझर नुकताच लॉन्च झाला आहे. टीझरमध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जून, मौनी रॉय अशी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले असून करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ६ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

बिग बजेट फिल्म

ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा बजेट ३०० कोटी रुपयांच्या घरात आहे. २०१८ साली या चित्रपटाच्या निर्मितीला सुरूवात झाली होती. त्यानंतर युरोप आणि भारतात या चित्रपटाच शूटिंग पूर्ण करण्यात आले. चित्रपटाच्या वीएफएक्समुळे अनेकवेळेलेला या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर कोरोना काळातही चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले. अखेर ५ वर्षानंतर २९ मार्च २०२२ रोजी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले. 

शाहरुख आणि मुन्ना भैय्याच्या भूमिका

या चित्रपटात शाहरुखची पाहुण्या कलाकाराची भूमिका असणार आहे. तसेच मिर्झापूरफेम मुन्ना भैय्या फेम  दिव्येंदू शर्माही या चित्रपटात असणार आहे. 

६ जूनला ट्रेलर

ब्रह्मास्त्र चित्रपटाचा ट्रेलर ६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच ९ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभरात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी