Panachayat Season 2 Trailer : अभिषेक प्रधानजींचा जावई होणार का? Panchayata 2 चा ट्रेलर प्रदर्शित

बहुप्रतिक्षित पंचायतच्या दुसर्‍या सीजनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ऐन कोरोना काळात आणि लॉकडाऊनमध्ये पंचायतचा पहिला सीजन ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला होता. अश्लील सीन्स, शिव्या देणारे संवाद अशा वेबसीरीजची रेलचेल असताना पंचायतने हा पॅटर्न नाकारला आणि प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण झाले. ऍमेझॉनने पंचायत २ ची अधिकृत घोषणा केली होती. आता पंचायत सीजन २ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

panchayat season 2
पंचायत सीजन २  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बहुप्रतिक्षित पंचायतच्या दुसर्‍या सीजनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
  • ऍमेझॉनने पंचायत २ ची अधिकृत घोषणा केली होती.
  • लवकरच पंचायतचा दुसरा सीजन ऍमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

Panchayat Season 2 Trailer : मुंबई : बहुप्रतिक्षित पंचायतच्या दुसर्‍या सीजनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ऐन कोरोना काळात आणि लॉकडाऊनमध्ये पंचायतचा पहिला सीजन ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला होता. अश्लील सीन्स, शिव्या देणारे संवाद अशा वेबसीरीजची रेलचेल असताना पंचायतने हा पॅटर्न नाकारला आणि प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण झाले. काही दिवसांपूर्वी ऍमेझॉनने धडाधड अनेक चित्रपट, वेबसीरीज आणि सीरीजचे सीजन्सच्या घोषणा केल्या होत्या. त्यात पंचायतचाही समावेश होता. त्यानंतर ऍमेझॉनने पंचायत २ ची अधिकृत घोषणा केली होती. आता पंचायत सीजन २ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 


पंचायतच्या सीजनचा शेवट अभिषेक आणि रिंकीच्या भेटीने होतो. आता अभिषेक प्रधानजींचा जावई होणार का? अभिषेक कॅट परीक्षा पास होणार का तसेच अभिषेक गावाच्या विकासात कुठली महत्त्वाची भूमिका बजावणार या प्रश्नांची उत्तरे नव्या सीजनमध्ये मिळणार आहेत. पंचायतचा दुसरी सीजन २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी