थिएटरमध्ये हॉरर सिनेमा अॅनाबेला पाहत असताना ७७ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

झगमगाट
Updated Jul 09, 2019 | 16:04 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

थिएटरमध्ये सध्या हॉलिवूड सिनेमा अॅनाबेला कम्स होम या सिनेमाचा फिव्हर पाहायला मिळत आहे. मात्र हा सिनेमा पाहताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

anabella comes home
अॅनाबेला कम्स होम 

थोडं पण कामाचं

  • थायलंडमधील आहे ही घटना
  • सिनेमा पाहत असतानाच बर्नार्ड यांचा मृत्यू
  • अॅनाबेला कम्स होम २८ जूनला झाला होता रिलीज

मुंबई: थिएटरमध्ये सध्या हॉलिवूड सिनेमा अॅनाबेला कम्स होम हा सिनेमा सुरू आहे. या हॉरर सिनेमाला जगभरातून पसंती मिळत आहे. हा सिनेमा इतका हॉररपट आहे की यामुळे एका ७७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. रिपोर्ट्सनुसार थिएटरमध्ये सिनेमा पाहत असताना भीतीने त्यांचा मृत्यू झाला. 

ही घटना थायलंडमधील आहे. ७७ वर्षीय ब्रिटीश नागरिक बनार्ड चॅनिंग सिनेमा पाहत होते. सिनेमा संपल्यानंतर लाईट सुरू झाली यावेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या महिलेने त्यांच्या दिशेने पाहिले असता त्यांचा मृत्यू झाला होता. महिलाने ओरडून इर्मजन्सी सर्व्हिसला बोलावले. सिनेमा सुरू असताना बनार्ड यांचा मृत्यू झाल्याचे कोणालाच समजले नाही. त्यांना अॅम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या घटनेनंतर ती महिला अद्याप धक्क्यातून सावरू शकलेली नाही. 

हॉलिवूड सीरीजच्या हॉरर फिल्म अॅनाबेलाचा तिसरा पार्ट अॅनाबेला कम्स होम २६ जूनला रिलीज झाला आहे. रिलीजनंतर या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सिनेमात मॅकेना ग्रेस, मॅडिसन इज्मॅन, पॅट्रिक विल्सन आणि वेना फर्मिंगा प्रमुख भूमिकेत आहेत. ट्रिक आणि वेरा यांनी सिनेमात अॅड आणि लॉरिनची भूमिका साकारली आहे. 

हा सिनेमा इंग्रजीव्यतिरिक्त हिंदी, तामिळ आणि तेलुगु या तीन भाषेत रिलीज करण्यात आला होता. दरम्यान, बर्नार्ड यांचा मृत्यू चित्रपट पाहण्यामुळेच झाला की त्यांना काही आजार होता याचा अद्याप खुलासा झालेला नाही. याआधी २०१६मध्ये आंध्र प्रदेशमध्ये The Conjuring 2 हा सिनेमा पाहत असताना एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. 

अॅनाबेला कम्स होम हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्याचे बोलले जात आहे. यानुसार १९७०मध्ये अमेरिकेत एका आईने आल्या मुलीसाठी बाहुली घेतली होती. ही बाहुली काही दिवसानंतर आपोआप चालायला लागली. असं म्हटलं जात की या बाहुलीमध्ये अॅनाबेला नावाच्य मुलीचा आत्मा शिरला होता. Comicbook.comला एका साक्षीदाराने दिलेल्या माहितीनुसार, गेटवर काही लोक स्टाफशी बोलत होते. ते त्या थिएटरमध्ये होते जिथे त्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. ते खूप त्रस्त होते. ही घटना आश्चर्यजनक होती. काही लोक त्या मृत व्यक्तीच्या शेजारी बसले होते. थिएटरच्या कर्मचाऱ्यांनाही या घटनेने मोठा शॉक बसला. 

याआधीही हॉररपट सिनेमा बघताना अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे कमजोर हृदय असलेल्या व्यक्तींनी असे चित्रपट बघणे टाळावे. 

 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
थिएटरमध्ये हॉरर सिनेमा अॅनाबेला पाहत असताना ७७ वर्षीय वृद्धाचा मृत्यू Description: थिएटरमध्ये सध्या हॉलिवूड सिनेमा अॅनाबेला कम्स होम या सिनेमाचा फिव्हर पाहायला मिळत आहे. मात्र हा सिनेमा पाहताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles