Anushka-virat Scooty ride : अनुष्का शर्मा ( Anushka Sharma ) आणि विराट कोहलीने (Virat Kohali ) स्कूटीवरून मुंबईच्या रस्तांवर सैर केली. या दोघांचा स्कूटीवरून फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची खूपच चर्चा सुरू आहे. त्यांची ही स्कूटी राईड सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. ( Anushka and Virat enjoyed scooter ride in Mumbai )
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या सुट्टीवर आलेला आहे. आता आशिया चषकासाठी विराट यूएईला रवाना होणार आहे.त्याआधी अनुष्का आणि विराटने स्कूटीवरून राईड मारली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यांच्या या व्हिडिओची एकच चर्चा रंगली.
अधिक वाचा : व्यापाऱ्याशी लग्न केलं, युरोप टूर केली आणि घातला गंडा
मुंबईतील मड आयलँड भागातील हा व्हिडिओ असल्याचं म्हटलं जात आहे. एका प्रोजेक्टच्या शूटिंगासाठी अनुष्का आणि विराट तिथे आल्याचं म्हटलं जातं. शूटिंगनंतर या दोघांनी स्कूटर राईडचा आनंदही लुटला. स्कूटी राईडच्यावेळी विराट-अनुष्काने सुरक्षा नियमांचं पालन केलेलंही दिसलं. या दोघांनीही हेल्मेट घातलं होतं. मात्र, तरीही अनेकांनी त्यांना ओळखलं.
अधिक वाचा : चमकदार त्वचेसाठी मध सर्वोत्तम उपाय,असा करा वापर; होईल फायदा
इंग्लंड दौऱ्यानंतर माजी कर्णधारानं विश्रांती घेतली होती. आशिया चषकाच्या तयारीसाठी विराट कोहली तयारी करतोय. संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तो बॅटिंगची प्रॅक्टिस करतोय. तसंच विराट सध्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देतोय.
गेल्या काही वर्षात विराटची बॅट म्हणावी तशी तळपलेली नाही. त्याचा फॉर्म गेल्या काही वर्षात खूपच कमी झालाय. त्याला आपली जादू दाखवता आलेली नाही. त्यामुळे आगामी आशिया चषकामध्ये विराट कोहलीचा फॉर्म परत येईल आणि त्याच्या बॅटमधून रन्सचा पाऊस पडेल अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.