Katvick and Virushka live in Same building । मुंबई : बाॅलिवूड स्टार कतरिना कैफ आणि विकी कौशल हे दोघे काल लग्नाच्या बेडीत अडकले. या नवविवाहित जोडप्यांना सेलिब्रिटींकडून शुभेच्छा संदेशांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, कतरिना कैफच्या झिरो आणि जब तक है जान या फिल्मची को-स्टार अनुष्का शर्मा हिने एक खास संदेश दिला आहे. त्याची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगत आहे. (Anushka Sharma finally confirms that newlyweds Katrina Kaif and Vicky Kaushal are moving into her building)
अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकतेच लग्न करणाऱ्या विकी कौशल आणि कतरिना कैफला शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्काशिवाय आलिया भट्ट, करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा यांनीही कॅटविकला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अनुष्काने सोशल मीडिया पोस्टमध्ये विकी आणि कतरिनाच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. तिने लिहिले- तुम्हा दोघांचे अभिनंदन. मला आशा आहे की तुम्ही दोघेही आयुष्यभर अतिशय हुशारीने एकत्र राहाल. मला सुद्धा खूप आनंद झाला आहे की शेवटी तुमचं लग्न झालंय आणि आता तुम्ही लवकरच तुमच्या नवीन घरी जाऊ शकता. अशा परिस्थितीत यापुढे बांधकामांचा आवाज ऐकावा लागणार नाही.
सुत्रांच्या माहितीनुसार, विक्कीने नवीन वर्षाच्या सुरुवातीला अंधेरी येथे असलेल्या त्याच्या पालकांच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याने कैफसोबत जुहू येथे एक जागा भाड्याने घेतली जिथे ते दरमहा 8 लाख रुपये भाडे देत आहेत. लग्नानंतर, दोघे त्यांच्या नवीन घरात राहतील आणि तिथेच कैफने लग्नानंतर तिचे गृहप्रवेश विधी करणे अपेक्षित आहे.
लग्नाआधीच विकी कौशल नवीन घराच्या शोधात होता. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर त्यांनी जुहूमध्ये एक आलिशान अपार्टमेंट घेतले. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे घरही याच इमारतीत आहे. रिअल इस्टेटचे मालक वरुण सिंह यांनी काही मीडिया हाऊसला सांगितले होते की विकीने हे अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे आणि त्यासाठी भरीव रक्कम दिली आहे. त्यांनी इमारतीचा आठवा मजला भाड्याने घेतला असून 36 महिन्यांसाठी 1.75 कोटी आगाऊ रक्कम दिली आहे.