‘पगल्या’ मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सन्मान, तुर्की आणि ओन्को मध्ये सर्वोत्तम पुरस्कार

दिग्दर्शक विनोद पीटर यांनी 'ग्लॅडिएटर फिल्म फेस्टिव्हल' (टीजीएफएफ) तुर्की येथे 'पगल्या' या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आणि ओन्को एस्टोनिया इथे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकाविला

arathi film 'Pagalya' won international honors, Best Award in Turkey and Onco
‘पगल्या’ चित्रपटाला आंतरराष्ट्रीय दोन सन्मान 

थोडं पण कामाचं

  • दिग्दर्शक विनोद पीटर यांनी 'ग्लॅडिएटर फिल्म फेस्टिव्हल' (टीजीएफएफ) तुर्की येथे 'पगल्या' या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार
  • ओन्को एस्टोनिया इथे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकाविला आहे.
  • पगल्या या चित्रपटाने मॉस्को इंटरनॅशनल फिल्म 2021 (Moscow International Film Festival 2021) मध्ये समीक्षकांची मने जिंकली.

पगल्या या चित्रपटाने मॉस्को इंटरनॅशनल फिल्म 2021 (Moscow International Film Festival 2021) मध्ये समीक्षकांची मने जिंकल्यानंतर दिग्दर्शक विनोद पीटर यांनी 'ग्लॅडिएटर फिल्म फेस्टिव्हल' (टीजीएफएफ) तुर्की येथे 'पगल्या' या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आणि ओन्को एस्टोनिया इथे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकाविला आहे. लहान मुलांच्या भावविश्वात पाळीव प्राण्यांचे असणारे स्थान आणि प्राण्यांबद्दल असणाऱ्या त्यांच्या निरागस भावना या चित्रपटामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आजपर्यंत, या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा मराठी चित्रपटाचे नाव शिरोपेचात रोवले गेले आहे. इतकेच नाही तर आत्तापर्यंत जगभरातल्या विविध चित्रपट महोत्सवांमध्ये 47 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनोद सॅम पीटर यांनी केले आहे.  

या चित्रपटाबाबत निर्माते-दिग्दर्शक विनोद सॅम पीटर म्हणतात की, "एक निर्माता म्हणून माझ्या पहिल्याच चित्रपटाला जागतिक व्यासपीठावर ओळख मिळतेय ते पाहून मी खूप खूष आहे. अधिकृत निवडीबद्दलच नाही तर अनेक महोत्सवात या चित्रपटाला मिळालेले पुरस्कार गौरवास्पद आहेत. मला आनंद होत आहे की, एका मराठी चित्रपटाला विविध देशांमध्ये आपली ओळख मिळत आहे. असे बरेच काही फिल्म फेस्टीवल झाले आहेत ज्यांत निवडलेल्या किंवा पुरस्कार मिळालेल्या यादिंमध्ये ’पगल्या’ हा पहिला चित्रपट आहे. भारताचा झेंडा जगभरात झळकल्याचा आपल्याला अभिमानच वाटतो."

‘पगल्या’ या मराठी चित्रपटाला मॉस्को इंटरनॅशनल फिल्म 2021 चा (Moscow International Film Festival 2021) बेस्ट फॉरेन फीचर अवॉर्ड मिळाला आहे. तसेच इटली, अमेरिका, युके आणि स्वीडन या देशातील चित्रपट महोत्सवात देखील या चित्रपटाची निवड झाली आहे. या सिनेमाला आंतरराष्ट्रीय पातळीवर दाद मिळत आहे. या सिनेमाला कॅलिफोर्नियातील लॉस वर्ल्ड प्रीमियरमध्येही गौरवण्यात आलं. याशिवाय लंडन, इटली, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, फिलिपाईन्स, तुर्की, इराण, अर्जेंटिना, लेबनन, बेलारुस, रशिया, कझाकिस्तान, इज्रायल, अमेरिका आणि कॅनडामध्ये विविध फिल्म फेस्टिव्हल्समध्ये सन्मान मिळवले आहेत. तसेच कॅलिफोर्निया येथे झालेल्या वर्ल्ड प्रीमिअर फिल्म अवॉर्ड या पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शक विनोद पीटर यांच्या ‘पगल्या’ या चित्रपटाने बाजी मारली आहे.

हा चित्रपट संपूर्ण टीमचं एक कठोर परिश्रम आहे जे पगपासून ते कलाकारापर्यंत कौतुकास्पद अभिनयासाठी पात्र आहेत. अब्राहम फिल्म्स साठी अभिमानाची गोष्ट आहे जे अश्या टॅलेंटेड कलाकारांशी जुडले गेले आणि आता आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये प्रोत्साहन पाहून विनोद पीटर आणि त्याची टीम भारतीय प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहण्यास अत्यंत उत्सुक आहे हे सांगायला नकोच.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी