Arjun Kapoor Sold His House: मलायका अरोरापासून दुरावला अर्जुन कपूर, यापुढे नसणार सख्खे शेजारी

झगमगाट
पूजा विचारे
Updated Jul 22, 2022 | 12:40 IST

Arjun Kapoor House:अर्जुन कपूर अभिनेत्री मलायका अरोरा (Actress Malaika Arora) सोबतच्या नात्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. पण आता अर्जुनबद्दल चर्चा होण्याचा विषय थोडा वेगळा आहे.

 Arjun Kapoor Malaika Arora
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • अर्जुन कपूर (Bollywood star Arjun Kapoor) आजकाल सोशल मीडियावर बराच चर्चेत असतो.
  • अर्जुन सध्या 'एक व्हिलन 2 (Ek Villain 2) सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.
  • अभिनेत्री मलायका अरोरा (Actress Malaika Arora) सोबतच्या नात्यामुळे चांगलाच चर्चेत आहे.

मुंबई:  Arjun Kapoor Malaika Arora: बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर (Bollywood star Arjun Kapoor) आजकाल सोशल मीडियावर बराच चर्चेत असतो. अर्जुनच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक लाईफबद्दल नेहमीच चर्चा होत असते. अर्जुन सध्या 'एक व्हिलन 2 (Ek Villain 2) सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. तर दुसरीकडे अर्जुन कपूर अभिनेत्री मलायका अरोरा (Actress Malaika Arora) सोबतच्या नात्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. पण आता अर्जुनबद्दल चर्चा होण्याचा विषय थोडा वेगळा आहे. 

काही महिन्यांपूर्वीच अर्जुन कपूरनं मलायकाच्या अपार्टमेंटच्या जवळच एक 4 बेडरुम असलेलं एक घर विकत घेतलं होतं. पण आता हे घर त्यानं घेतलेल्या किंमतीपेक्षाही कमी किंमतीत विकलं आहे. वांद्रे पश्चिम येथील '81 औरत बिल्डिंग'मधील एक अपार्टमेंट 16 कोटी रुपयांना विकलं. या संपूर्ण व्यवहारात अर्जुनचा तोटा झाल्याचं देखील बोललं जात आहे.

अधिक वाचा-  भिवंडीत लगेचच बदलली निष्ठा, आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला शिवसैनिकांची मोठी गर्दी, पण पाठ फिरताच...

बहिण अंशुलानं केली सही 

मलायकाच्या अपार्टमेंटच्या जवळचं अर्जुनं हे एक घर घेतलं होतं. ज्याची किंमत तब्बल 20 कोटी रुपये एवढी होती. केसी मार्गावरील इमारतीच्या 19व्या मजल्यावर हा 4,364 चौरस फुटांचा फ्लॅट आहे. मात्र अभिनेत्याने आपला फ्लॅट विकण्यामागचे कारण सांगितलेलं नाही. फ्लॅटची नोंदणी 19 मे 2022 रोजी झाली. या कागदपत्रांवर अर्जुनची बहीण अंशुला कपूरची सही असल्याचं समजतंय.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by 81 Aureate (@81aureate)

खूपच आलिशान होतं घर 

अर्जुनचे हे घर सी-फेसिंग होते. जिथून वरळी सी-लिंकचा सुंदर नजारा दिसायचा.  या फ्लॅटमध्ये स्पा, लायब्ररी, पूल अशा अनेक आलिशान सुविधा होत्या. सध्या अर्जुन जुहू येथील रहेजा ऑर्किड घरात राहतो. त्याचवेळी त्याची लेडी लव्ह मलायका '81 औरत बिल्डिंग'मध्ये राहते. या इमारतीत मलायकाशिवाय सोनाक्षी सिन्हा, करण कुंद्रा आणि क्रिकेटर पृथ्वी शॉ देखील राहतात.

अर्जुन कपूरची संपत्ती

'caknowledge.com' नुसार अर्जुन कपूरची एकूण संपत्ती 74 कोटी रुपये आहे. एका सिनेमासाठी अर्जुन 5 ते 7 कोटी रुपये घेतो. याशिवाय त्यांच्या ब्रँडच्या जाहिरातीतूनही भरपूर पैसे मिळतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

अर्जुन कपूरचे अपकमिंग प्रोजेक्ट 

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अर्जुन कपूर लवकरच 'एक व्हिलन रिटर्न्स' या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे 'कुट्टे' आणि 'द लेडी किलर' हे सिनेमे आहेत. याआधीही या अभिनेत्याचे अनेक सिनेमे प्रदर्शित झाले आहेत, मात्र बॉक्स ऑफिसवर सर्वच सिनेमे फ्लॉप झाले आहेत. अर्जुन आणि त्याच्या चाहत्यांना या सिनेमाकडून खूप आशा आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी