Aryan Khan: 'या' अभिनेत्याच्या मेहुणीसोबत पार्टी करताना स्पॉट झाला शाहरूखचा लाडका आर्यन, Photos Viral

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 31, 2022 | 07:58 IST

Aryan Khan Party Photos Viral: क्लीन चीट मिळाल्यानंतर आर्यन खान हळूहळू आपल्या नॉर्मल लाईफमध्ये अॅक्टिव्ह होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तो एका क्लबमध्ये पार्टी करताना दिसला. आता पुन्हा एकदा आर्यन पार्टी करताना दिसला. पण यावेळेच चित्र काहीसं वेगळं आहे.

Aryan Khan
आर्यन खान  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • क्लीन चीट मिळाल्यानंतर आर्यन खान हळूहळू आपल्या नॉर्मल लाईफमध्ये अॅक्टिव्ह होताना दिसत आहे.
  • आता पुन्हा एकदा आर्यन पार्टी करताना दिसला. पण यावेळेच चित्र काहीसं वेगळं आहे.
  • यावेळी आर्यन एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीसोबत दिसला.

मुंबई: Aryan Khan Photos Viral With Katrina's sister Isabelle: बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज क्रूझ प्रकरणात कंट्रोल ब्यूरोकडून (Narcotics Control Bureau) अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला NCB नं प्रकरणात क्लीन चीट दिली. आता क्लीन चीट मिळाल्यानंतर आर्यन खान हळूहळू आपल्या नॉर्मल लाईफमध्ये अॅक्टिव्ह होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तो एका क्लबमध्ये पार्टी करताना दिसला. तेव्हाचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आर्यन पार्टी करताना दिसला. पण यावेळेच चित्र काहीसं वेगळं आहे. यावेळी आर्यन एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीसोबत दिसला. आता हा फोटो व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात. (Aryan Khan spotted partying with Katrina kaif sister Isabelle Photos Viral)

नुकताच आर्यन कतरिना कैफची बहीण इसाबेलसोबत मित्राच्या पार्टीत दिसला.

त्या पार्टीत एन्जॉय करताना दिसला आर्यन 

आर्यन त्याची मैत्रिण श्रुती चौहानच्या बर्थडे पार्टीत सहभागी झाला होता. या पार्टीत इसाबेलही त्याच्यासोबत दिसली. श्रुतीने इंस्टाग्रामवर पार्टीचे काही फोटोजची सीरिज शेअर केली आहे. ज्यामध्ये आर्यन प्रत्येक वेळी प्रमाणेच खूप कूल अंदाजात दिसला. आर्यन खानने ब्लॅक-व्हाइट-यलो कलर मिक्स-अप जॅकेटसह ब्लॅक टी-शर्ट घातला होता. यासोबत त्याने ग्रे जीन्स टीमअप केली होती. या पार्टीत आर्यन खानचा स्वॅग वेगळा दिसत होता.

बर्थडे गर्ल श्रुती चौहानच्या बर्थडे पार्टीचे अनेक फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये आर्यन खानही मित्रांसोबत त्याच्या रॉकिंग आणि मस्त अंदाजात दिसत आहे. त्याचवेळी त्याच्यासोबत इसाबेलही स्पॉट झाली आहे. याशिवाय करण टकर देखील या फोटोंमध्ये दिसत आहे.

कॅटची बहीण काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट दिसत आहे. बर्थडे पार्टीतील या फोटोंसोबत श्रुतीने केक कटिंगची व्हिडिओ क्लिपही शेअर केली आहे. श्रुती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे. तिने रणवीर सिंगच्या 'गली बॉय' या सिनेमात छोट्याशी भूमिका साकारली होती. 

अधिक वाचा- CIDCO Lottery 2022: गणेशोत्सवानिमित्त सिडकोकडून 4158 घरांसाठी लॉटरी जाहीर, वाचा कुठल्या परिसरात किती घरे

आर्यन खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आर्यन लवकरच वेब सिरीज लेखक म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर सलमान खान देखील इसाबेलला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी