अतुल गोगावलेचं स्वप्न झालं पूर्ण, कारच्या किमंतीची खरेदी केली लक्झरी बाईक

संगीतकार अतुल गोगावले यांना बाईक्सची खूप आवड आहे. अनेकदा ते बाईकवरून लाँग ड्राईव्हला जात असतात. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता अतुलनं एमडब्ल्यूआर १२५० जीएस ( BMW R1250 GS) ही अधिक अत्याधुनिक अशी बाईक विकत घेतली आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ अतुलनं त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Atul Gogavale's dream come true, find out the price and features of the first bike to be launched in India
अतुल गोगावले स्वप्न झालं पूर्ण, कारच्या किमंतीची खरेदी केली लक्झरी बाईक ।   |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • तुलनं एमडब्ल्यूआर १२५० जीएस ( BMW R1250 GS) ही लक्झरी बाईक खरेदी केली
  • त्याचे फोटो आणि व्हिडिओ अतुलनं त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मुंबई : आयुष्यात प्रत्येकाचं काहीना काही स्वप्न असते. मग तो सेलिब्रिटी असो वा सर्व सामान्य प्रत्येक जण आपलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी धडपडत असतो. 'अजय-अतुल' या संगीतकार जोडीने मराठी तसेच बाॅलिवूडमधील अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आज यशाच्या शिखरावर पोहचलेल्या या जोडीतील अतुल गोगावले आज एक स्वप्न पूर्ण झाले. (Atul Gogavale's dream come true, find out the price and features of the first bike to be launched in India)

अधिक वाचा : 

Bollywood actresses trolled for their saree looks : कियारा अडवाणी ते दीपिका पदुकोण, या बॉलीवूड अभिनेत्रींना त्यांच्या साडी लुकमुळे मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले

अतुलने एका बाईकच्या शोरूममधून त्याने व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी देखील दिसत आहे. त्याने म्हटलं आहे की, मी माझ्या स्वप्नातील bike BMW R1250 GS ही बाइक घेतली आहे. आणि मला एकचं सांगाचे आहे ही खूपच बेस्ट आहे..अशा शब्दात त्याने त्याचा आनंद व्यक्त केला आहे.

अतुलचं लहानपणापासून एक स्वप्न होते. त्याला त्याच्या स्वप्नातील एक गाडी घ्यायची होती. ते स्वप्न आता पूर्ण झालं आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील त्याने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

अधिक वाचा : 

Karan Johar 6 Regret in Life: करण जोहरने वैयक्तिक आयुष्याबाबत केले 6 धक्कादायक खुलासे, आयुष्यातील खंत

लक्झरी कार बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जर्मन कंपनी BMW च्या दुचाकी उत्पादन युनिटने भारतात नवीन R 1250 GS एडवेंचर मोटरसायकल लाँच केली आहेत. BMW Motorrad ची R 1250 GS Pro ची किंमत 20.45 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी