Avatar 2 Movie : रिलीज होण्याआधीच 'अवतार 2'ने केली कोट्यवधींची कमाई

Avatar 2 Box Office Advance Booking Beats Thor : Love And Thunder, Aiming To Thrash Doctor Strange 2 and Spider Man : No Way Home With An Unbelievable Pick Up : बहुप्रतिक्षित चित्रपट द 'वे ऑन वॉटर' - अवतार टू या चित्रपटाने भारतात रिलीज पूर्वीच कोट्यवधींची कमाई केलीय..आजपर्यंतचा सर्वाधिक खर्चिक चित्रपट असलेला अवतार टू भारतात शुक्रवारी 3 हजार स्क्रीनवर रिलीज होत आहे.

Avatar 2
Avatar 2 Movie : रिलीज होण्याआधीच 'अवतार 2'ने केली कोट्यवधींची कमाई  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Avatar 2 Movie : रिलीज होण्याआधीच 'अवतार 2'ने केली कोट्यवधींची कमाई
  • अवतार चित्रपटाचे पाच भाग तयार केले जाणार
  • पहिला 2009 मध्ये रिलीज झाला, दुसरा 16 डिसेंबर 2022 रोजी रिलीज होणार

Avatar 2 Box Office Advance Booking Beats Thor : Love And Thunder, Aiming To Thrash Doctor Strange 2 and Spider Man : No Way Home With An Unbelievable Pick Up : बहुप्रतिक्षित चित्रपट द 'वे ऑन वॉटर' - अवतार टू या चित्रपटाने भारतात रिलीज पूर्वीच कोट्यवधींची कमाई केलीय..आजपर्यंतचा सर्वाधिक खर्चिक चित्रपट असलेला अवतार टू भारतात शुक्रवारी 3 हजार स्क्रीनवर रिलीज होत आहे.  या चित्रपटाची 6 लाखापेक्षा अधिक तिकीटं अॅडव्हांस बुकिंग मध्ये विकली गेलीत..त्यामुळे या चित्रपटाची कमाई पहिल्याचं दिवशी 1200 कोटींवर जाणार असल्याचं बोललं जातंय.या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सर्वात जास्ती म्हणजे 2 हजार कोटींपेक्षा खर्च करण्यात आला आहे..

अवतार चित्रपटाचे पाच भाग तयार केले जाणार आहेत. पैकी पहिला 2009 मध्ये रिलीज झाला होता तर दुसरा 16 डिसेंबर 2022 रोजी रिलीज होत आहे. तिसरा भाग  20 डिसेंबर 2024 मध्ये, अवतार चार 18 डिसेंबर 2026 मध्ये तर अवतार पाच 22 डिसेंबर 2028 मध्ये येणार आहे. या आधी ‘स्पायडरमॅन – नो वे होम’ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 5 लाख तिकीटांची विक्री केली होती.
 
‘डॉक्टर स्ट्रेंज – मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस’ या चित्रपटाची ३.८० लाख तिकीटं विकली गेली होती. अवतार टू ने अगदी काही दिवसातचं हा रेकॉर्ड मोडीत काढला असून एक इतिहास रचला आहे..

अवतार या चित्रपटाचा पहिला भाग 2009 मध्ये रिलीज झाला होता. तर, आता तेरा वर्षांनी या चित्रपटाचा पुढचा भाग अर्थात ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ येत्या 16 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने तब्बल 20 हजार कोटींची कमाई करत कलेक्शनचे रेकॉर्ड मोडले होते. आता हा सिक्वेल देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

होम लोन आणि कार लोन महागणार

Money Tips: नोकरी जाण्याची शक्यता असेल तर करा ही 5 कामं

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी