Avatar 2 Box Office Collection : अवतार 2 ची 100 कोटींकडे वाटचाल

avatar the way of water hollywood movie box office collection james cameron film avatar 2 collection : अवतार : द वे ऑफ वॉटर अर्थात अवतार 2 या हॉलिवूडच्या सिनेमाने भारतात प्रदर्शित झाल्यानंतर 2 दिवसांत 86 कोटी रुपयांची कमाई केली.

avatar the way of water
अवतार 2 ची 100 कोटींकडे वाटचाल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • अवतार 2 ची 100 कोटींकडे वाटचाल
  • दोन दिवसांत 86 कोटी रुपयांची कमाई
  • पहिल्या वीकेंडमध्ये सिनेमा 100 कोटी रुपयांचा टप्पा सहज ओलांडेल असा अंदाज

avatar the way of water hollywood movie box office collection james cameron film avatar 2 collection : अवतार : द वे ऑफ वॉटर अर्थात अवतार 2 या हॉलिवूडच्या सिनेमाने भारतात प्रदर्शित झाल्यानंतर 2 दिवसांत 86 कोटी रुपयांची कमाई केली. सोशल मीडियावर अवतार 2 या हॉलिवूडच्या सिनेमाची भरपूर चर्चा आहे. 

भारतात अवतार : द वे ऑफ वॉटर हा सिनेमा शुक्रवार 16 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी सिनेमाने 41 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 45 कोटी रुपयांची कमाई केली. आज रविवार आहे. सुटीचा दिवस आहे. यामुळे आज (रविवार 18 डिसेंबर 2022) मोठ्या प्रमाणात अवतार : द वे ऑफ वॉटर हा सिनेमा बघितला जाण्याची शक्यता आहे. पहिल्या वीकेंडमध्ये सिनेमा 100 कोटी रुपयांचा टप्पा सहज ओलांडेल असा अंदाज सिनेसृष्टीतून व्यक्त होत आहे.

अवतार हा हॉलिवूडचा सिनेमा 2009 मध्ये प्रदर्शित झाला यानंतर 13 वर्षांनी डिसेंबर 2022 मध्ये अवतार : द वे ऑफ वॉटर हा अवतारचा सिक्वल आला. यामुळेच अवतार : द वे ऑफ वॉटर या सिनेमाला अनेकजण अवतार 2 या नावानेही ओळखत आहेत. 

अवतार : द वे ऑफ वॉटर हा 3 तास 12 मिनिटे (एकूण 192 मिनिटे) एवढ्या कालावधीचा सिनेमा आहे. या सिनेमाच्या निर्मितीसाठी 400 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढा प्रचंड खर्च झाला. हा जगातल्या सर्वाधिक महाग चित्रपटांपैकी एक आहे. अवतार सिनेमाचे आणखी भाग पुढील काही वर्षांमध्ये येणार आहेत. पण या भागांचे यश हे अवतार : द वे ऑफ वॉटर या सिनेमाला मिळणाऱ्या यशावर अवलंबून आहे. 

जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित अवतार 2 सिनेमाला आयएमडीबीने 10 पैकी 8.1 रेटिंग दिले आहे. या सिनेमात सॅम वर्थिंग्टन, झो सलदाना, सिगोर्नी वीवर, 
स्टीफन लँग, केट विन्सलेट हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी