Avatar : The Way of Water : अखेर तब्बल १३ वर्षानंतर प्रतीक्षा संपली, Avatar 2 चा ट्रेलर युट्युबर प्रदर्शित

हॉलिवूडचा मोस्ट अवेटेड अवतरा २ चा ट्रेलर युट्युबर रीलीज झाला आहे. तब्बल १३ वर्षानंतर अवतारचा सिक्वेल प्रदर्शित होणार आहे. अवतारच्या चाहत्यांची इच्छा १३ वर्षानंतर पूर्ण होणार आहे. 

Avatar : The Way of Water
अवतार २ चा ट्रेलर प्रदर्शित  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • हॉलिवूडचा मोस्ट अवेटेड अवतरा २ चा ट्रेलर युट्युबर रीलीज झाला आहे.
  • तब्बल १३ वर्षानंतर अवतारचा सिक्वेल प्रदर्शित होणार आहे.
  • अवतारच्या चाहत्यांची इच्छा १३ वर्षानंतर पूर्ण होणार आहे. 

Avatar : The Way of Water : मुंबई : हॉलिवूडचा मोस्ट अवेटेड अवतरा २ चा ट्रेलर युट्युबर रीलीज झाला आहे. तब्बल १३ वर्षानंतर अवतारचा सिक्वेल प्रदर्शित होणार आहे. अवतारच्या चाहत्यांची इच्छा १३ वर्षानंतर पूर्ण होणार आहे. 

२००९ साली प्रदर्शित झालेल्या अवतारच्या सिक्वेलची घोषणा तर झाली होती. परंतु या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सातत्याने पुढे ढकलण्यात आली होती. २०२० मध्ये जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होणार होता तेव्हा जगावर कोरोनाचे संकट येऊन आदळले. त्यानंतर पुन्हा या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख दोन वर्षांनी पुढे ढकलण्यात आली. अखेर १३ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अवतारचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अवतार २ चे अधिकृत नाव अवतार द वे ऑफ वॉटर आहे. मार्वलच्या डॉक्टर स्ट्रेंज चित्रपटापूर्वी आधी अवतार २ चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. आता युट्युबवर अवतार २ चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी या ट्रेलरला भरभरून प्रतिसाद दिला आहे. 

समुद्रपर्यटन
अवतारच्या सिक्वेलमध्ये जेक सुली आणि त्याचे कुटुंबीय पँडोराचे इतर भाग एक्सप्लोअर करतात. दरम्यान जेकला मुलं बाळं झालेली असतात. परंतु जे संकट त्यांनी दूर केले असतं ते पृथ्वीवरचं संकट पुन्हा त्यांच्यासमोर येऊन ठाकले आहे. या सगळ्यांशी जेक आणि पँडोराचे लोक कसा लढा देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 


डिसेंबर मध्ये होणार प्रदर्शित
अवतार २ चा ट्रेलर जरी आता प्रदर्शित झाला असला तरी चाहत्यांना यासाठी आणखी सात महिने वाट पहावी लागणार आहे. अवतार जगभरात १२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेपा प्रदर्शित व्हायला जरी अवकाश असला तरी प्रेक्षकांना ३डी आणि इतर वेगवेगळ्या माध्यमातून हा चित्रपट पाहता येणार आहे. 


पिक्चर अभी बाकी है
अवतार २ जरी १३ वर्षानंतर प्रदर्शित होणार असला तरी पुढच्या चित्रपटांसाठी प्रेक्षकांना फार काळ वाट पहावी लागणार नाही. दिग्दर्श्क आणि निर्माते जेम्स कॅमेरॉन यांनी या चित्रपटाचे पुढील ३ भाग बनवले असून दर दोन वर्षांनी हे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अवतार ३, २० डिसेंबर २०२४, अवतार ४ हा १८ डिसेंबर २०२६ आइ अवतार ५ हा २२ डिसेंबर २०२८ ला प्रदर्शित होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी