‘एवेन्जर्स एन्डगेम’ सिनेमाचा भारतात अॅडवान्स बुकिंगमध्ये नवीन विक्रम, काही तासातच तिकीट विक्री साईट्स ठप्प

झगमगाट
Updated Apr 22, 2019 | 13:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

‘एवेन्जर्स एन्डगेम’ भारतीय बॉक्स ऑफिस गाठणार हे कळताच फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली होेती. त्यामुळे सिनेमाची अॅडवान्स बुकिंग उघडण्याची वाट चातकासारखी पाहिली जात होती. पण हे बुकिंग एक दिवस आधी उघडलं आणि...

Avengers Endgame to break all advance booking records in India, all shows already houseful
भारतीय फॅन्सची व्यथा, ‘एवेन्जर्स एन्डगेम’ची तिकीट मिळेना  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: ऍवेन्जर्स या जगप्रसिद्ध हॉलिवूड सिनेमांच्या सिरीझमधला शेवटचा भाग ‘एवेन्जर्स एन्डगेम’ लवकरच भारतात रिलीज होणार आहे. मार्वेल फॅन्ससाठी ही एक पर्वणीच आहे असं म्हणता येईल. त्यामुळे हा सिनेमा भारतात रिलीज होणार आणि त्याचं अॅडवान्स बुकिंग 21 एप्रिल म्हणजेच रविवारी सुरू होणार ही बातमी कळताच फॅन्सनी कंबर कसली ती तिकीट बूक करण्यासाठी. पण पीव्हीआर या थिएटरने शनिवारीच सिनेमाचं अॅडवान्स बुकिंग उघडलं आणि सगळीकडे धुमाकूळ माजला. अवघ्या काही तासातंच अॅडवान्स बुकिंग संपलं सुद्धा आणि शो हाऊसफुल्ल झाले. एवढंच नव्हे तर या बुकिंगची गर्दी ऑनलाईन इतकी होती की बुक माय शो आणि पेटीएमसारख्या साईट्स तर ठप्प झाल्या. ‘एवेन्जर्स एन्डगेम’ने या साईट्सचा गेम काही काळासाठी तरी स्थगित केला असं काहीसं म्हणता येईल.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Marvel Entertainment (@marvel) on

 

फक्त आयनॉक्सच्या अंतर्गत असलेल्या सगळ्या थिएटरच्या अ्ॅडवान्स बुकिंगमध्ये तब्बल 14 तासात 6 कोटींचा विक्रमी आकडा पार केल्याचं म्हटलं जातंय. तर इतर सगळ्या मोठ्या थिएटरमधले शुक्रवार, शनिवार आणि रविवारचे ‘एवेन्जर्स एन्डगेम’ सिनेमाचे सगळेच शो हाऊसफुल झाले आहेत. त्यामुळे हा सिनेमा भारतीये अॅडवान्स बुकिंगमध्ये एक नवीन रेकॉर्ड कायम करेल असं दिसतंय. या महिन्याच्या सुरूवातीला या मोस्ट अवेटेड हॉलिवूड सिनेमाचं अमेरिकेत अॅडवान्स बुकिंग सुरू केलं गेलं आणि भारतात आता निर्माण झालेली परिस्थिती तिथे सुद्धा पाहायला मिळाली. स्टार वॉर्स या भल्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसच्या सर्वाधिक बुकिंग करणाऱ्या सिनेमांच्या पुढे जात या सिनेमाच्या बुकिंगने नवीन रेकॉर्ड कायम केला. तर काही रिसेल साईट्सवर या सिनेमाच्या तिकीट 500 डॉलर्स म्हणजे तब्बल 35 हजाराला एक अशा विकल्या जात होत्या. भारतात ही असं झालं तर नवल वाटू नये. कारण सिनेमाची क्रेझच तेवढी आहे. अनेक फॅन्सना या अॅडवान्स बुकिंगमध्ये तिकीट मिळाल्या नसल्याने सोशल मीडियावर अनेक मीम्सने जन्म घेतला आहे आणि या मीम्सद्वारे हे फॅन्स आपली व्यथा व्यक्त करताना दिसले.

 

 

 

 

ट्रेड ऍनलिस्ट तरण आदर्श यांनी सुद्धा या अॅडवान्स बुकिंगची नोंद घेत ट्विट केलं आहे आणि त्यात ते म्हणाले आहेत की सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुद्धा एक नवीन रेकॉर्ड कायम केल्या शिवाय राहणार नाही.

 

 

सिनेमाची बुकिंग आणि क्रेझ बघता सिनेमाला 40 कोटींचं ओपनिंग मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे सिनेमा या वर्षाचं 21 कोटी 60 लाखांचं सर्वाधिक ओपनिंग मिळालेल्या मल्टी स्टारर ‘कलंक’ला मागे टाकेल यात काही वाद नाही. गेल्या वर्षी याच सिनेमाच्या आधीचा भाग ‘एवेन्जर्स: इन्फिनीटी वॉर्स’ने भारतीय बॉक्स ऑफिस काबीज केलं होतं.  ‘एवेन्जर्स एन्डगेम’’ सिनेमाच्या ऍडवान्स बुकिंग सारखेच ‘एवेन्डजर्स: इन्फिनीटी वॉर्स’ची तिकीट विक्री झाली होती. तब्बल 20 लाख तिकीट अॅडवान्स बुकिंगमध्ये बुक झाल्या तर रिलीजच्या पहिल्या आठवड्यात सिनेमाने भारतात 120 कोटींची विक्रमी कमाई केली होती. तब्बल 10 वर्षांच्या मार्वेलच्या सिनेमांचा साठा या ‘एवेन्जर्स एन्डगेम’मध्ये पाहायला मिळणार आहे. जागतिक व्हिलन टायटन थानोसचा अखेर या सिनेमात खात्मा होणार असल्याचं बोललं जातं त्यामुळे एवेन्जर्सचे सगळे हिरो मिळून त्याचा खात्मा अखेर करणार म्हणून सिनेमाची रंजकता वेगळीच असेल हे निश्चित. ‘एवेन्जर्स एन्डगेम’ हा सिनेमा येत्या 26 एप्रिल रोजी भारतात बॉक्स ऑफिस गाठणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
‘एवेन्जर्स एन्डगेम’ सिनेमाचा भारतात अॅडवान्स बुकिंगमध्ये नवीन विक्रम, काही तासातच तिकीट विक्री साईट्स ठप्प Description: ‘एवेन्जर्स एन्डगेम’ भारतीय बॉक्स ऑफिस गाठणार हे कळताच फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली होेती. त्यामुळे सिनेमाची अॅडवान्स बुकिंग उघडण्याची वाट चातकासारखी पाहिली जात होती. पण हे बुकिंग एक दिवस आधी उघडलं आणि...
Loading...
Loading...
Loading...