आयुषमान खुरानावरही #SareeTwitter ट्रेंडची नशा, ड्रीम गर्ल बनताना शेअर केला साडीतील फोटो

झगमगाट
Updated Jul 17, 2019 | 23:54 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

ट्विटरवर सध्या #SareeTwitterचा ट्रेंड सुरू आहे. बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानानेही या ट्रेंडला जॉईन करताना साडीमधील आपला फोटो शेअर केला आहे.

ayushman khurana
आयुषमान खुराना 

थोडं पण कामाचं

  • आयुषमान खुरानावर #SareeTwitter ट्रेंड
  • आयुषमानचा साडीतील फोटो व्हायरल
  • चाहत्यांना आवडलाय त्याचा हा फोटो

मुंबई: सोशल मीडियावर एखादा ट्रेंड आला तर लगेचच तो व्हायरल होतो. बॉटल कॅप चॅलेंजनंतर आता ट्विटरवर नवा ट्रेंड आला आहे. सध्या ट्विटरवर #SareeTwitter ट्रेंडची नशा आहे. यात साडी नेसून फोटो शेअर करावा लागतो. यात केवळ सामान्य लोकच नव्हे तर कलाकार, राजकीय नेतेही भाग घेत आहेत. साडी ट्रेंड महिलांसाठी असेल मात्र बॉलिवूडचा अभिनेता आयुषमान खुरानावरही या ट्रेंडचा फिव्हर दिसत आहे. तोही या लीगमध्ये सामील झाला आहे. 

नुकताच आयुषमानने ट्विटरमधील आपल्या साडीचा फोटो शेअर केला आहे. यात तो एका सुंदर ब्लू रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. यासोबतच त्याने मॅचिंग बांगड्याही घातल्या आहेत. साडी तर त्याच्यावर कमालीची सुंदर दिसत आहे. फोटोमधील त्याचे एक्सप्रेशन जबरदस्त आहेत. यात तो एका टू व्हीलरवर बसला आहे. यासोबतच त्याने कॅप्शन दिली आहे, ड्रीमगर्ल या वर्षाच्या अखेरीस#SareeTwitter. 

आयुषमान लवकरच राज शांडिल्या यांच्या ड्रीम गर्ल या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्याशिवाय अरबाज खान आणि सोनू के टीटू की स्वीटी फेम नुसरत भरूचा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात आयुषमान साडी नेसताना दिसणा आहे. यातच त्याने #SareeTwitter ट्रेंडमध्ये दाखवले आहे. आयुषमानचा हा फोटो त्याच्या चाहत्यांना खूपच आवडलाय. त्याच्या चाहत्यांनी बेस्ट, आयुष तु #SareeTwitter कॉम्पिटिशन जिंकली आहे. आयुष्मा, शक्ल तेरी बडी सोणी ऐ सारख्या कमेंट्स केल्या आहेत. 

आयुषमान खुराना त्या अभिनेत्यापैकी एक आहे जो सतत सारख्या भूमिका करत नाही. तो नेहमी सिनेमा आणि अॅक्टिंगसोबत एक्सपिरिमेंट करायला आवडते. नुकताच आयुषमानचा आर्टिकल १५ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला होता. या सिनेमाला चांगले रिव्ह्यूज मिळाले आहेत आणि आयुषमानच्या अभिनयाचेही कौतुक केले जात आहे. या सिनेमात दलितांवर होणाऱ्या अत्याचार तसेच भेदभाव दाखवण्यात आला होता. 

या सिनेमात दिसणार आयुषमान

आयुषमानकडे सध्या भरपूर सिनेमे आहेत. ड्रीम गर्ल व्यक्तिरिक्त तो गुलाबो सिताबोमध्ये दिसणार आहे. या सिनेमात आयुषमान पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमातील बिग बीचा खास लूक व्हायरलही झाला होता. यात त्यांना ओळखणे कठीण होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
आयुषमान खुरानावरही #SareeTwitter ट्रेंडची नशा, ड्रीम गर्ल बनताना शेअर केला साडीतील फोटो Description: ट्विटरवर सध्या #SareeTwitterचा ट्रेंड सुरू आहे. बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानानेही या ट्रेंडला जॉईन करताना साडीमधील आपला फोटो शेअर केला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...