कसम से, बडे अच्छे लगते है या हिंदी मालिकेतून अभिनेता राम कपूर घराघरात पोहोचले. मालिकांसह त्यांनी काही हिंदी चित्रपटातही काम केले आहे. तसेच त्यांची पत्नी गौतमी कपूर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे. सध्या राम कपूर टीव्ही मालिकेतील मोठं नाव आहे. नुकतंच राम कपूर यांनी पत्नी गौतमीला अलिबागमध्ये एक मोठं घर गिफ्ट केले आहे. राम कपूर यांनी अलिबाग्माध्ये एक मोठा विला विकत घेतला असून आपल्या कुटुंबीयांसोबत ते सुटीसाठी इथेल आले होते. राम कपूर यांनी सोशल मीडियावर याचे फोटोही शेअर केले होते. (bade achhe lagte hain actor ram kapoor brought 20 crore worth villa in alibaug)
मिळालेल्या माहितीनुसार हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझेन खानने या घराचे इंटेरियर डेकोरेशन केले आहे. या विलामध्ये सर्वप्रकारच्या सुख सुविधा आहेत. सुझेन आणि राम कपूरने याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. अनेक सेलिब्रीटींनी हे फोटो आणि व्हिडीओ लाईक केले असून कमेंट्सही केली आहे. या विलाची किंमत तब्बल २० कोटी रुपये इतकी आहे असे सांगण्यात येत आहे.
मुंबईपासून दूर एका शांत ठिकाणी घर असावे असे राम आणि गौतमी यांचे स्वप्न होते. खंडाळ्यातही या दाम्पत्याचे एक घर आहे. आता अलिबागमध्ये समुद्र किनारी त्यांना हा विला घेतला असून त्यांचे हे नवीन व्हेकेशन डेस्टिनेशन झाले आहे.
राम कपूर यांच्या अलिबागमधील या घरातील डायनिंग रूम, हॉल आणि किचन उत्तम आहे. राम कपूर आपली पत्नी गौतमी कपूर मुलं अक्स कपूर आणि सिया कपूर यांच्यासोबत सुटी घालवण्यासाठी इथेच येतात.