Aishwarya Rai Beauty Secrets: पन्नाशीच्या उंबरठ्यावरही ऐश्वर्याला ‘या’ गोष्टी ठेवतात तरुण, वाचा रहस्य

मूल झाल्यानंतर महिला स्वतःकडे लक्ष देत नाहीत आणि स्वतःचा फिटनेसही मेंटेन करत नाहीत, अशी स्थिती आजूबाजूला दिसते. मात्र ऐश्वर्याच्या बाबतीत परिस्थिती अशी नाही. आपल्या मुलाबरोबरच स्वतःची ही तितकीच काळजी घेणाऱ्या महिलांपैकी ऐश्वर्या राय एक आहे.

Aishwarya Rai Beauty Secrets
पन्नाशीच्या उंबरठ्यावरही ऐश्वर्याला ‘या’ गोष्टी ठेवतात तरुण  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचे रहस्य काय?
  • पन्नाशीच्या उंबरठ्यावरही आहे फिट अँड फाईन
  • भारताप्रमाणेच जगभरात चाहते

Aishwarya Rai Beauty Secrets: ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) ही जगातील सर्वाधिक लावण्यवती महिलांपैकी एक आहे. इतक्या वर्षानंतरही ऐश्वर्या रायकडे पाहिल्यानंतर तिला विश्वसुंदरी हा किताब का देण्यात आला होता, हे सहज समजू शकतं. ऐश्वर्याच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात तिचे चाहते विखुरलेले आहेत. ऐश्वर्या आता 49 वर्षांची झाली आहे. मात्र तिचा सौंदर्य पाहिल्यावर ती दिवसेंदिवस अधिकाधिक तरुण होत चालल्याची भावना तिचे चाहते व्यक्त करतात. ऐश्वर्याला एक मुलगीदेखील आहे. साधारणतः आपल्याला मूल झाल्यानंतर स्वतःकडे दुर्लक्ष करायला महिला सुरुवात करतात, असा अनुभव असतो. मूळ झाल्यानंतर महिला स्वतःकडे लक्ष देत नाहीत आणि स्वतःचा फिटनेसही मेंटेन करत नाहीत, अशी स्थिती आजूबाजूला दिसते. मात्र ऐश्वर्याच्या बाबतीत परिस्थिती अशी नाही. आपल्या मुलाबरोबरच स्वतःची ही तितकीच काळजी घेणाऱ्या महिलांपैकी ऐश्वर्या राय एक आहे. चाळीशीतही ऐश्वर्याप्रमाणेच फिट आणि हेल्दी राहायचं असेल, तर त्यासाठी तिच्या आरोग्याचं आणि सौंदर्याचं रहस्य जाणून घेणे आवश्यक आहे. या गोष्टी जाणून घेतल्यानंतर आई असणारी प्रत्येक महिला स्वतःची तितकीच उत्तम काळजी घेऊ शकते आणि फिट राहू शकते.

भरपूर पाणी पिणे

आपलं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने भरपूर पाणी पिले पाहिजे, असा सल्ला ऐश्वर्या देते. त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी विटामिनयुक्त मात्र साधा आहार घेण्याचा सल्ला ती देते. भरपूर पाणी पिणे आणि पुरेसा पौष्टिक आहार घेणे या दोन्ही गोष्टींमुळे आपण आतून आणि बाहेरूनही सुंदर राहतो.

अधिक वाचा - Bipasha Basu : सात महिन्यांच्या प्रेग्नंट बिपाशा बासूचा बेधडक डान्स, चाहते म्हणाले "बिप्स,जरा जपून"

अरोमा थेरपी

आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी ऐश्वर्याचा अरोमा थेरपीवर विश्वास आहे. यामुळे नाकातील रिसेप्टर्स उत्तेजित होतात. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूतील भागाला त्यामुळे पोषण मिळते.

आवडीनिवडी जपणे

शरीराबरोबरच मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी आपल्या आवडीनिवडी जपणे आवश्यक असल्याचे ती सांगते. इसेन्शियल ऑईलमध्ये चंदन घालून त्वचेला मसाज करणे, हा उत्तम उपाय असल्याचे तिला वाटते. वाढते ताणतणाव दूर करण्यासाठी देखील याचा उपयोग होतो.

अधिक वाचा - Bigg Boss 16 : सौंदर्या आणि गौतमच्या रोमान्सची अब्दू रोजिकने केली नक्कल, व्हिडिओ पाहून चाहते हैराण

लाल लिपस्टिक

कुठल्याही वयात आकर्षक दिसण्यासाठी लाल लिपस्टिक सर्वोत्तम असल्याचे ऐश्वर्या रायचे मत आहे. लाल लिपस्टिक लावल्यामुळे तुम्ही इतरांना आकर्षित करून घेता. इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठीदेखील लाल लिपस्टिकचा उपयोग होत असतो.

पुरेशी झोप

प्रत्येकाला सरासरी सात ते नऊ तासांची झोप आवश्यक असते. सातत्याने कमी झोप घेणाऱ्या माणसांना वेगवेगळे विकार जडायला सुरुवात होते. त्यामुळे त्वचेवरही परिणाम होऊन व्यक्ती वयापेक्षा अधिक मोठी वाटू लागते. हे टाळण्यासाठी झोपेच्या वेळा पाळणे आणि दररोज किमान सात ते नऊ तासांची मुबलक झोप घेणे आवश्यक असल्याचा सल्ला ऐश्वर्या देते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी