Bhagya dile tu mala: 'भाग्य दिले तू मला' मालिकेत येणार नवा ट्विस्ट, मंगळागौरीच्या कार्यक्रमात पडणार मिठाचा खडा

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 16, 2022 | 12:57 IST

Bhagya dile tu mala Special episode: मराठी मालिकाविश्वात काकू - बोक्याच्या जोडीला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. आता या मालिकेत मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी करताना दिसणार आहेत.

Bhagya dile tu mala
भाग्य दिले तू मला 
थोडं पण कामाचं
  • कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' (bhagya dile tu mala) ही मालिका चांगलीच गाजते आहे.
  • सध्या मराठी मालिकाविश्वात काकू - बोक्याच्या जोडीला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे.
  • आता या मालिकेत मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी करताना दिसणार आहेत.

मुंबई: Bhagya dile tu mala Mangalagaur episode: कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' (bhagya dile tu mala) ही मालिका चांगलीच गाजते आहे. या मालिकेनं कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.  सध्या मराठी मालिकाविश्वात  काकू - बोक्याच्या जोडीला  प्रचंड लोकप्रियता मिळत  आहे. आता या मालिकेत मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी करताना दिसणार आहेत.

मालिकेत मंगळागौरीची चांगलीच जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी कावेरी इतर महिलांसोबत मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहे. कावेरीनं पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. तसंच छान मराठमोळे दागदागिनेही परिधान केले आहेत. तिच्या अवतीभवती असलेल्या महिलांनी ही पारंपारिक नऊवारी साडी नेसली आहे. यात कावेरी डान्स करतानाही दिसणार आहे. या स्पेशल एपिसोडमध्ये मंगळागौरीची पारंपरिकरित्या पूजा करण्यात येणार आहे. मंगळागौरीची पूजा केल्यानंतर खेळ बघायला मिळणार आहेत.

अधिक वाचा- डबल मर्डरनं हादरली राजधानी,सासू सुनेची घरात घुसून निर्घृण हत्या

पण मालिकेत मंगळागौर साजरी होत असताना सानिया मात्र या आनंदाच्या क्षणात मिठाचा खडा टाकणार आहे. त्यामुळे या आनंदाच्या वातावरणात असा कोणता ट्विस्ट येणार आहे हे पाहावं लागेल. भाग्य दिले तू मला मालिकेचा मंगळागौर विशेष भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

भाग्य दिले तू मला मालिकेत राजवर्धनची भूमिका अभिनेता विवेक सांगळे साकारत आहे. त्याचबरोबर कावेरीच्या भूमिकेत तन्वी मुंडले तर रत्नमालाची भूमिका अभिनेत्री निवेदिता सराफ या साकारत आहेत. सध्या मालिकेत रोज नवीन घडामोडी पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात या मालिकेनं 100 भागांचा टप्पा यशस्वीरीत्या पार केला. 

काकू आणि बोक्याची जोडी सध्या सगळीकडेच ट्रेंडिंगमध्ये आहे. मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासून या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. या दोघांमधील  छोटी छोटी भांडणं पण नंतर प्रेमाने एकमेकांना केलेली मदत हे  प्रेक्षकांना बघायला आवडत आहे.   प्रेक्षकवर्गही या मालिकेला भरभरून प्रतिसाद देत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी