Akanksha Dubey Suicide: Bhojpuri Actress आकांक्षा दुबेची आत्महत्या, हॉटेल रूममध्ये मिळाला मृतदेह

झगमगाट
भरत जाधव
Updated Mar 26, 2023 | 14:01 IST

Akanksha dubey Commit suicide: भोजपुरी अभिनेत्री  25 वर्षीय आकांक्षा दुबेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसीच्या एका हॉटेलमध्ये तिचा मृतदेह मिळाला आहे.

Akanksha Dubey Suicide
आकांक्षा दुबेची आत्महत्या, हॉटेल रूममध्ये मिळाला मृतदेह   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ोजपुरी अभिनेत्री 25 वर्षीय आकांक्षा दुबेने आत्महत्या केली.
  • भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आकांक्षा दुबे लोकप्रिय नाव आहे.
  • आकांक्षाने खूप कमी वयात भोजपुरी चित्रपटात मोठं यश मिळवलं होतं.

Akanksha dubey Commit suicide At Hotel Room: भोजपुरी चित्रपटसृष्टीवर (Bhojpuri Film Industry) आज दुखाचा डोंगर कोसळला आहे. भोजपुरी अभिनेत्री  25 वर्षीय आकांक्षा दुबेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसीच्या एका हॉटेलमध्ये तिचा मृतदेह मिळाला आहे. आकांक्षा दुबेच्या कुटुंबात तिचे आई-वडील आणि भावंड आहेत. तिचे कुटुंब उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात राहते आणि तीही कुटुंबासोबत राहत होती. परंतु तिने आत्महत्या का केली याचे कारण समजलेलं नाही. (Bhojpuri Actress Akanksha Dubey committed suicide, body found in hotel room)

अधिक वाचा  : माधुरी दीक्षित नेनेच्या सुंदर लेहेंगा लूकचे क्या कहने

भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आकांक्षा दुबे लोकप्रिय नाव आहे. इंस्टाग्राम रिल्समध्येही तिला खूप पसंती मिळायची. आकांक्षा दुबे ही तिच्या म्युझिक अल्बममुळे नेहमी चर्चेत असायची, आता तिची अचानक आत्महत्या खूप धक्कादायक आहे. आकांक्षाने आत्महत्या का केली याचं खरं कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने याआधी पवन सिंगसोबत अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केलं होतं. दोघांनी 'करवतीया', 'साता के पैसा' मध्ये एकत्र काम केले होते आणि ही गाणी चांगलीच गाजली होती.

अधिक वाचा  : दर्दी परिणीति चोप्रा ,एक नाही अनेकवेळा तुटलंय दिल

आकांक्षाने खूप कमी वयात भोजपुरी चित्रपटात मोठं यश मिळवलं होतं. मेरी जंग मेरा फैसला नावाच्या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.  वह मुझसे शादी करोगी (भोजपुरी), वीरों के वीर, फाइटर किंग, कसम पैदा करने के 2 सारख्या चित्रपटात तिने काम केलं आहे. 

अधिक वाचा  : संसाराचा काडीमोड झाला तर असं रहा खूश

आकांक्षा दुबेने आपल्या करिअरची सुरुवात Tik Tokपासून केली होती.   Instagram आणि  Youtubeव र तिने आपल्या कलेने अनेकांच्या हृदयात जागा मिळवली होती. जेव्हा लाखो लोक तिला पसंत करू लागले, तेव्हा आकांक्षा दुबेने भोजपुरी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर एकापेक्षा एक सरस चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली .  हळूहळू आकांक्षा अनेकांच्या हृदयात घर करून गेली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी