Bhool Bhulaiyaa 2 Trailer : अंतरयामी नही, हरामी है, भुलभुलैय्या २ चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

बहुप्रतिक्षित भुल भुलैय्याचा २ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. कार्तिक आर्यन, कियारा आडवाणी, तब्बू यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सिंह इस किंग, वेलकम फेम अनीस बाझमीने केले आहे. ३१ जुलै २०२० ला हा चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु कोविडमुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

Bhool Bhulaiyaa 2
भुल भुलैय्या २  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बहुप्रतिक्षित भुल भुलैय्याचा २ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
  • कार्तिक आर्यन, कियारा आडवाणी, तब्बू यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सिंह इस किंग, वेलकम फेम अनीस बाझमीने केले आहे.
  • कोविडमुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

Bhool Bhulaiyaa 2 : मुंबई : बहुप्रतिक्षित भुल भुलैय्याचा २ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. कार्तिक आर्यन, कियारा आडवाणी, तब्बू यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सिंह इस किंग, वेलकम फेम अनीस बाझमीने केले आहे. ३१ जुलै २०२० ला हा चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु कोविडमुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. अखेर कोविड कमी झाल्यावर २० मे रोजी हा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे होती. 

२००७ साली आलेल्या भुल भुलैय्या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, शायनी अहुजा, अमिषा पटेल, परेश रावल, मनोश जोशी, रसिका जोशी, राजपाल यादव, मोहन गोखले, आसरानी अशी तगडी स्टारकास्ट होती. या चित्रपट चांगलाच हिट झाला होता. विद्या बालनच्या अभिनयामुळे तिला प्रेक्षकांची खास पसंती मिळाली होती. आता या चित्रपटाचा सिक्वल येऊ घातला आहे. कार्तिक आर्यनचा पहिला लूक जारी झाल्यानंतर या चित्रपटाची उत्सुकता होती. काही दिवसांपूर्वी याचा टीझर प्रदर्शित झाल्यने प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली होती. आता २० मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी