Salman Khan: जाताजाता स्वामींनी सलमान खानविषयी केला 'हा' मोठा दावा, आता होतेय जोरदार चर्चा

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 13, 2022 | 13:39 IST

Salman Khan News: बॉलिवूडमधून (Bollywood) एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. ही खळबळजनक बातमी बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) यांच्यासंदर्भातली आहे.

Salman khan
सलमान खान  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो आहे. या शोमधून आतापर्यंत अनेक खळबळजनक आणि धक्कादायक खुलासे झाले आहेत.
  • बिग बॉस 10 मध्ये स्पर्धक म्हणून आलेल्या स्वामी ओम (Swami Om) हे त्यांच्या विचित्र वागण्यामुळे चर्चेत आले होते.
  • स्वामी ओम बिग बॉस 10 मधून बाहेर आल्यानंतर त्याच्या वक्तव्याची बरीच चर्चा झाली होती.

मुंबई:  Swami Om Once Claimed Salman Khan Has AIDS: बॉलिवूडमधून (Bollywood) एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. ही खळबळजनक बातमी बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) यांच्यासंदर्भातली आहे. बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो आहे. या शोमधून आतापर्यंत अनेक खळबळजनक आणि धक्कादायक खुलासे झाले आहेत. त्यातच आता बिग बॉस 10 मध्ये स्पर्धक म्हणून आलेल्या स्वामी ओम (Swami Om) हे त्यांच्या विचित्र वागण्यामुळे चर्चेत आले होते. या शोमध्ये त्यांनी सलमान खानबद्दल धक्कादायक दावा केला होता. सलमान खानला एड्स असल्याचा दावा स्वामी ओम यांनी केला आहे. तसंच सलमाननं अजून लग्न का केलं नाही त्याबाबतही स्वामीने सांगितलं होतं.

धक्कादायक दाव्या करणाऱ्या स्वामी ओमचं निधन 

स्वामी ओम बिग बॉस 10 मधून बाहेर आल्यानंतर त्याच्या वक्तव्याची बरीच चर्चा झाली होती. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून लोकांनी स्वामी ओम यांच्या कानशिलातही लगावल्या आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी 2021 रोजी स्वामी ओम यांचे 63 व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांना अर्धांगवायूचा झटकाही आला होता. त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात उपचार सुरू होते. 

अधिक वाचा-  रक्षाबंधनाला बहिणीला गिफ्ट देण्यासाठी भावानं केला मोठा प्रताप, थेट पोहोचला तुरूंगात

सलमाननं दाखवला होता बाहेरचा रस्ता 

सलमानने स्वामी ओम यांना बिग बॉस 10 मधून बाहेरचा रस्ता दाखवला होता. स्वामी ओम यांचं इतर स्पर्धकांसोबत वागणं बोलणं ठिक नव्हतं. इतर स्पर्धकांना ते चांगली वागणूक देत नव्हते. सलमाननं शोमधून बाहेर काढल्यानंतर स्वामी ओम यांनी त्याच्यावर आरोपांवर आरोप करण्यास सुरूवात केली होती. यात त्यांनी सर्वांत धक्कादायक आरोप केला की, सलमान खान एड्ससारख्या धोकादायक आजाराशी झुंज देत आहे. त्यामुळेच तो लग्न करत नाही, असं ते म्हणाले होते. इतंकच काय तर सलमानला लंडनमध्ये एक मुलगी असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

''सलमान खानची ही करा तपासणी''

समोर आलेल्या रिपोर्टनुसार, स्वामी ओम म्हणाले होते की, प्रत्येक नवरात्रीला मी 1 हजार 8 मुलींचे पाय धुवून पूजा करतो आणि त्या चरणामृताने मी एड्स आणि कॅन्सरसारखे आजार बरे करतो. त्यानंतर मी बिग बॉसला सांगितलं होतं की, तुमच्या सलमान खानलाही एड्ससारखा गंभीर आजार आहे, तुम्ही त्याची तपासणी करा. तुम्हाला 3 मिनिटांत रिपोर्ट मिळेल.

''सलमानला लंडनमध्ये आहे एक मुलगी''

सलमानला एड्ससारखा आजार असल्यानं तो लग्न करत नाही आहे आणि इतकंच नाही तर त्याला लंडनमध्ये एक मुलगी ही असल्याचा दावा त्यांनी केला होता. पुढे स्वामी ओम म्हणाले होते की, सलमान हे लपवतो ही वेगळी बाब आहे. दुसऱ्या एका मुलाखतीत त्याने सलमान खान हा आयएसआय एजंट असून हाफिज सईद, दाऊद इब्राहिम, मसूद अझहर आणि अबू सालेम यांसारखे लोक त्याचे मित्र असल्याचा आरोपही केला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी