Bigg Boss 13: आज मिळणार नॉमिनेटेड पुरुष स्पर्धकांना सेफ होण्याची शेवटची सुवर्ण संधी

झगमगाट
Updated Oct 18, 2019 | 18:48 IST | चित्राली चोगले

बिग बॉस १३च्या घरात या आठवड्याला ४ पुरुष स्पर्धक नॉमिनेटेड आहेत. या सगळ्यांना आज घरात एक सुवर्ण संधी मिळणारे. स्वतःला सेफ करण्याच्या या संधीचा कोण फायदा करुन घेतो ते आज कळेल. वाचा नेमका कसा रंगेल आजचा एपिसोड.

bigg boss 13 today the male nominated contestants will get a last chance to save themselves from nominations
Bigg Boss 13: आज मिळणार नॉमिनेटेड पुरुष स्पर्धकांना सेफ होण्याची शेवटची सुवर्ण संधी  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस १३ घरात आज नॉमिनेटेड पुरुष स्पर्धकांना मिळणार सुवर्ण संधी
  • ४ नॉमिनेटेड पुरुष संपर्धकांना स्वतःला सेफ करण्याची बिग बॉस देणार शेवटची संधी
  • टास्क, टॉर्चर आणि नॉमिनेशनपासून सेफ होण्याची धडपड

मुंबई: बिग बॉस १३च्या घरात सध्या दोन गट निर्माण झालेले आहेत आणि ते अगदी स्पष्टपणे दिसत आहे. एकीकडे आहे सिद्धार्थ शुक्ला आणि त्याचा ग्रुप. ज्यामध्ये आहे शेहनाझ गील, आसीम खान, अबू मलिक आणि आरती सिंग. तर दुसरीकडे आहे पारस छाब्रा आणि त्याचा ग्रुप, ज्यामध्ये आहेत माहिरा खान, रश्मी देसाई, देवोलीना भट्टाचार्यजी आणि सिद्धार्थ डे. शेफाली बग्गा सिद्धार्थ डेच्या जवळची असली तरी कुठल्याही ग्रुपचा अद्याप तरी भाग नाहीये. सध्या घरात या दोन ग्रुप्स प्रमाणे खेळ पुढे सरकत आहे. नुकताच घरात मुलींचा नॉमिनेशन टास्क रंगला आणि त्याच्यामध्ये रश्मी आणि माहिरा नॉमिनेट झाल्या. त्यानंतर मुलांचा नॉमिनेशन टास्क झाला आणि त्यामध्ये सिद्धार्थ डे, असीम, अबू आणि पारस नॉमिनेट झाले.

 

आज घरात या सगळ्या नॉमिनेट पुरुष स्पर्धकांना एक सुवर्णसंधी मिळणार आहे. आज घरात एक खास टास्क रंगणार आहे ज्याच्या मध्ये बिग बॉस या नॉमिनेटेड पुरुष स्पर्धकांना स्वतःला सेफ करण्याची एक शेवटची संधी देतील. या चौघांपैकी कोणतरी एक स्पर्धक यातून सेफ होणार आहे. आज घरात भांडणं तर नक्कीच होतील कारण टास्क आहेच तसा. एकीकडे असीम आणि अबू तर दुसरीकडे पारस आणि सिद्धार्थ डे असा सामना रंगणार आहे. या चौघांनाही वेळोवेळी टॉर्चर करण्यात येईल. त्या टॉर्चरला सामोरं जात टास्क संपण्याचा बझर होईपर्यंत जो हात सोडणार नाही तो यातून सेफ होईल असं जाहीर होणार आहे. 

 

 

आज घरात हा टास्क धमाकेदार रंगेल यात काहीच वाद नाही. पण टास्कमध्ये टॉर्चर सुद्धा खूप होईल हे सुद्धा अगदी सहज आहे. सगळ्यात जास्त टॉर्चर असीमला सहन करावा लागणार आहे. त्याच्यावरती मिरची पावडर पासून घरात मिळेल त्या सगळ्या त्रासदायक गोष्टी टाकल्या जातील. तसंच इतर स्पर्धकांना सुद्धा टॉर्चर केलं जाणार आहे. प्रत्येक मुलगी आपल्या मित्राला सोडून ज्याला नॉमिनेट करायचं आहे त्याला टार्गेट करताना दिसेल. 

 

 

त्यामुळे आज टास्क अंती कोणतरी एक सेफ होईल पण बाकीची तीन मुलं मात्र नॉमिनेटेडंच राहतील. सिद्धार्थ शुक्ला आधीच सेफ झाल्यामुळे तो यंदा डेंजर झोन मध्ये नाही आहे. आज घरात हा टास्क कसा रंगतो ते पाहणे रंजक ठरेल. त्यातून मुलींनी केलेलं हे सगळे टॉर्चर सहन करून कोण यातून सेफ होतं ते सुद्धा आज स्पष्ट होईलंच. या सुवर्ण संधीचं कोण सोनं करतं ते आजच्या एपिसोडमध्ये कळेल आणि त्यातून कोण ३ पुरुष स्पर्धक नॉमिनेशनची टांगती तलवार डोक्यावर घेऊन पुढे जातात ते सुद्धा स्पष्ट होईल. त्यामुळे एकंदरीत आजचा एपिसोड एकदम धमाकेदार आणि रंजक होणार आहे हे नक्की आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी