Bipasha Basu: लग्नाच्या 6 वर्षांनंतर बिपाशा बासू- करण सिंग ग्रोव्हरच्या घरी हलणार पाळणा, बेबी बंपचा फोटो केला शेअर

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 16, 2022 | 14:44 IST

Bipasha Basu Babybump Photoshoot: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bollywood actress Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर (Actor Karan Singh Grover) यांच्या घरी लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे. आज बिपाशा बासूनं आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे.

Bipasha Basu Pregnant
बिपाशा बासू  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bollywood actress Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर (Actor Karan Singh Grover) यांच्या घरी लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे.
  • आज बिपाशा बासूनं आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे.
  • अभिनेत्री बिपाशा बासूने तिच्या सोशल मीडियावर बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत.

मुंबई: Bipasha Basu, Karan Singh Grover announce pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bollywood actress Bipasha Basu)  आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर  (Actor Karan Singh Grover) यांच्या घरी लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे. आज बिपाशा बासूनं आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. तिच्या या घोषणनेनं सर्वच जण आनंदी झाले आहेत. अभिनेत्री बिपाशा बासूने तिच्या सोशल मीडियावर बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये बिपाशासोबत करण सिंग ग्रोव्हरही दिसत आहे. दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. गेल्या बऱ्याच दिवसांपासून बिपाशा बासूच्या प्रेग्नेंसीची (Bipasha Basu's pregnancy) चर्चा होती. मात्र तेव्हा करण आणि बिपाशा यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. 

सध्या बिपाशा बसू आजकाल प्रेग्नेंसीचा आनंद घेत आहे आणि ती आता तिचं ट्रिमेस्टर आहे. दरम्यान, तिने बेबी बंपसोबत अतिशय ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. यामध्ये तिच्यासोबत तिचा पती आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर आहे. त्यांनी दोन फोटो शेअर केली असून त्यावर एक मोठी नोट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दोघंही त्याच्या आयुष्याच्या नव्या टप्प्याबद्दल खूप उत्सुक आहे. यासोबतच चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत.

अधिक वाचा- मोठी बातमी: जवानांनी भरलेली बस कोसळली नदीत, 6 जवान शहीद; 30 हून अधिक जखमी

बिपाशा बासूचं फोटोशूट 

फोटोमध्ये बिपाशा बासूने एक ओव्हरसाईज शर्ट घातला आहे ज्याचे बटण खाली आहे. तिचा बेबी बंप दिसत आहे. तिचा पती करण सिंग ग्रोवर तिचा बेबी बंप धरून आहे. दुसऱ्या फोटोत करण बिपाशाच्या बेबी बंपला किस करताना दिसत आहे. तर बिपाशाच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळत आहे. बिपाशा-करणचे हे फोटोशूट फोटोग्राफर प्रसाद नाईक यांनी केलं आहे.

2016  साली झालं बिपाशा-करणचं लग्न 

बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर यांचे एप्रिल 2016 मध्ये लग्न झालं आहे. त्यांच्या लग्नाला 6 वर्ष झाली आहेत. अजूनही दोघांमध्ये छान बॉन्डिंग आहे. याच कारणामुळे बिपाशा आणि करण यांनाही बेस्ट कपलपैकी असल्याचं मानलं जातं.

अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांची पहिली भेट 'अलोन' सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमाचे दिग्दर्शक भूषण पटेल  होते. या सिनेमात दोघांची केमिस्ट्री खूप आवडली होती. दोघांनी 2015 मध्ये डेट करायला सुरुवात केली आणि पुढच्याच वर्षी लग्न केलं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी