Amitabh Bachchan: बिग बींनी 11.25 मि. केलं महत्त्वाचं Tweet, दिली स्वतःची Health Update

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 24, 2022 | 08:03 IST

Amitabh Bachchan corona positive: बॉलिवूडचे महानायक (Bollywood superstar) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण (corona positive) झाली आहे.

Amitabh Bachchan corona positive
अमिताभ बच्चन  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • खुद्द बिग बींनी सोशल मीडियावर ट्विट करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
  • याआधी 2020 च्या जुलै महिन्यात अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
  • याआधी जुलै 2020 मध्ये अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांना कोरोनाची लागण झाली होती.

मुंबई:  Amitabh Bachchan Tests Positive For Corona:  बॉलिवूडचे महानायक (Bollywood superstar) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण  (corona positive) झाली आहे. खुद्द बिग बींनी सोशल मीडियावर ट्विट करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. याआधी जुलै 2020 मध्ये अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांना कोरोनाची लागण झाली होती. 

अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी रात्री ट्विट करून ही माहिती दिली आहे की, ते पुन्हा एकदा कोविड-19 पॉझिटिव्ह आहे.  यासह बिग बींनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना स्वतःची कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.  

अधिक वाचा-  Krushna Abhishek: 'The Kapil Sharma Show'मध्ये नसणार 'सपना का मसाज पार्लर' शोमधून कृष्णा अभिषेकची एक्झिट

अमिताभ बच्चन यांचं Tweet 

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर लिहिले की, "काही वेळापूर्वीच मी कोरोना पॉझिटिव्ह आलो आहे. माझ्या संपर्कात आलेले कोणीही, कृपया स्वतःची चाचणी करून घ्या." 

अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण

याआधी 2020 च्या जुलै महिन्यात अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांचा मुलगा  आणि अभिनेता अभिषेक बच्चनला ही कोरोनाची लागण झाली होती. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यावेळी जया बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन आणि ऐश्वर्या आणि अभिषेकची मुलगी आराध्या यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली होती. ऐश्वर्या आणि आराध्या होम आयसोलेशनमध्ये होत्या.

अमिताभ बच्चन यांचे अपकमिंग प्रोजेक्ट

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास ते सध्या इतर अनेक प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहेत. अलीकडेच अजय देवगण 'रनवे 34' सिनेमात ते दिसले होते. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. यानंतर ते अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 9 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. सध्या ते अमिताभ बच्चन सध्या क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती 14' होस्ट करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी