Ranveer Singh Naked Pictures: रणवीर सिंहच्या नव्या फोटोशूटची चर्चा, सोशल मीडियावर खळबळ; फोटो Viral

झगमगाट
पूजा विचारे
Updated Jul 22, 2022 | 10:30 IST

Ranveer Singh: आता पुन्हा एकदा रणवीर चर्चेत आला आहे. पण यावेळी तो त्याच्या कपड्यांवरून नाहीतर त्याच्या फोटोशूटमुळे (Photoshoot) ट्रेडिंगमध्ये दिसतोय.

Ranveer Singh
रणवीर सिंहच्या न्यूड फोटो  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • अभिनेता रणवीर सिंह (Actor Ranveer Singh) हा देखील त्याच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो.
  • त्याच्या कपड्यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू असते.
  • बऱ्याचदा रणवीर त्याच्या हटक्या कपड्यांमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर देखील येतो.

मुंबई:  Ranveer Singh Naked Photoshoot: बॉलिवूडमधल्या अभिनेते (Bollywood actors) आणि अभिनेत्री (Actresses) नेहमीच त्यांच्या आऊटफिट्समुळे (outfits) चर्चेत असतात. त्यांच्या स्टाईल स्टेंटमेंटमुळे कलाकारांची बरीच चर्चा होत असते. अभिनेता रणवीर सिंह (Actor Ranveer Singh) हा देखील त्याच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या कपड्यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू असते. बऱ्याचदा रणवीर त्याच्या हटक्या कपड्यांमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर देखील योते.

आता पुन्हा एकदा रणवीर चर्चेत आला आहे. पण यावेळी तो त्याच्या कपड्यांवरून नाहीतर त्याच्या फोटोशूटमुळे (Photoshoot)  ट्रेडिंगमध्ये दिसतोय. त्यानं एका मॅगझीनसाठी (Magazine) फोटोशूट केलं आहे. हे फोटो समोर येताच सोशल मीडियावर (Social Media) एकच गोंधळ उडाला आहे. 

अधिक वाचा-  गोल्डन बॉयची कमाल, नीरज चोप्रा पहिल्याच प्रयत्नात फायनलमध्ये

रणवीर सिंहनं अंगावर एकही कपडा न घालता फोटोशूट केलं आहे. म्हणजेच रणवीरनं आता चक्क न्यूड फोटोशूट केलं आहे. यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. रणवीर आज त्याच्या व्हायरल न्यूड फोटोमुळे सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. रणवीर सिंहचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by DietSabya® (@dietsabya)

पेपर नावाच्या अमेरिकी मॅगझीनसाठी रणवीर सिंहने नेकेड फोटो शूट केलं आहे. या फोटोशूटमधील काही फोटो समोर आले आहेत. या मॅगझीनसाठी त्यानं अतिशय बोल्ड फोटोशूट केलं आहे. काही फोटोंमध्ये रणवीर केवळ अंतर्वस्त्रावर दिसत आहे. या नेकेड फोटोंमध्ये तो एका टर्कीश कार्पेटवर पोज देताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये रणवीरच्या अंगावर एकही कपडे दिसत नाही आहेत. या फोटोत  तो पोज देताना दिसतोय.  रणवीरचं हे फोटोशूट अमेरिकी अभिनेता बर्ट रेनॉल्डच्या गाजलेल्या न्यूड फोटोशूटची आठवण करून देणारं आहे. डाएट सब्या नावाच्या व्हेरिफाइड इस्टाग्राम पेजवरुन रणवीरचे हे फोटो शेअर करण्यात आलेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी