Salman Khan granted gun license: Salman Khan ला जीवे मारण्याची धमकी प्रकरण, मुंबई पोलिसांनी दिली मोठी परवानगी

झगमगाट
पूजा विचारे
Updated Aug 01, 2022 | 13:30 IST

Salman Khan issued gun license for self-defense: सलमान खानला स्वसंरक्षणासाठी बंदूक ठेवण्याचा परवाना मिळाला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं याला दुजोरा दिला आहे. अलीकडेच सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

Salman khan
सलमाना खान 
थोडं पण कामाचं
  • मॉर्निंग वॉकच्या वेळी सलमान खानचे वडील सलीम खान (Salim Khan) यांना बेंचवर पडलेली एक चिठ्ठी सापडली होती.
  • या चिठ्ठीत त्यांना आणि सलमान खानला जीवे मारण्याची धमकीबद्दल लिहिलं होतं.
  • एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं रविवारी याला दुजोरा दिला आहे. सलमान खानने काही दिवसांपूर्वी बंदूक परवान्यासाठी अर्ज केला होता.

मुंबई:  Bollywood Actor Salman Khan Gets Arms Licence: बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं (Bollywood actor Salman Khan) अलीकडेच बंदुकीच्या परवान्यासाठी (Gun License) अर्ज केला होता. आता त्याला स्वसंरक्षणासाठी बंदूक ठेवण्याचा परवाना मिळाला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं याला दुजोरा दिला आहे. अलीकडेच सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मॉर्निंग वॉकच्या वेळी सलमान खानचे वडील सलीम खान (Salim Khan)  यांना बेंचवर पडलेली एक चिठ्ठी सापडली होती. ज्या चिठ्ठीत त्यांना आणि सलमान खानला जीवे मारण्याची धमकीबद्दल लिहिलं होतं. ही घटना समोर आल्यानंतर सलमान खाननं स्वसंरक्षणासाठी बंदूक परवान्यासाठी अर्ज केला होता, जो आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्याला जारी केला आहे.

अधिक वाचा- ग्राहकांसाठी Good News..! दिल्ली ते मुंबईतले LPG सिलिंडर स्वस्त, जाणून घ्या नवे दर

सलमानला मिळाला बंदुकीचा परवाना

एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं रविवारी याला दुजोरा दिला आहे. सलमान खानने काही दिवसांपूर्वी बंदूक परवान्यासाठी अर्ज केला होता आणि या संदर्भात 22 जुलै रोजी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचीही भेट घेतली होती. 

अधिकार्‍यांनी सांगितलं की, परवाना मिळविण्याच्या प्रक्रियेनुसार, फाइल पडताळणीसाठी पोलीस उपायुक्त (झोन 9) यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आली होती. यामध्ये फौजदारी नोंदीही तपासण्यात आल्या. दस्तऐवज पडताळणी आणि गुन्हेगारीचा तपास केला असता, धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस मुख्यालयाने फाइल मंजूर केली.

सलमानच्या प्रतिनिधीनं घेतला परवाना

सलमान खानच्या प्रतिनिधीने पोलीस मुख्यालयातील बंदूक परवाना शाखेतून मिळवला. 22 जुलै रोजी सलमान खान मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासमोर हजर झाला आणि दोघांमध्ये सुमारे अर्धा तास ही बैठक चालली. त्यानंतर परवाना देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. तसंच सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याची सुरक्षा 6 जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती. त्याच्या घराबाहेर पोलीस व्हॅनही तैनात करण्यात आली होती.

अधिक वाचा- भावाच्या अटकेनंतर आमदार सुनील राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की...

मूसेवाला याच्या मृत्यूनंतर सलमानला मिळाली होती धमकी 

पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला याची 29 मे रोजी पंजाबमधील मानसा येथे भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकीचे पत्र मिळालं होतं. त्या पत्रात 'तुझा ही मुसेवाला करेन' असं लिहिलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी