Alia Bhatt Net Worth: अभिनेत्री आलिया भट्टने फार कमी वेळात बॉलीवूडमध्ये मोठे स्थान मिळवले आहे. हे स्थान मिळवण्यासाठी अनेक सेलिब्रिटींचे अर्धे आयुष्य निघून जाते. यावेळच्या 'ए लिस्टर' सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत आलियाचे नाव सामील झाले आहे. आज बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत आलिया भट्टचे नाव समाविष्ट आहे. आलिया भट्टने वयाच्या 19 व्या वर्षी तिच्या करिअरला सुरुवात केली आणि आज तिच्याकडे करोडोंची संपत्ती आहे.
आलिया भट्टची एकूण संपत्ती
आलिया भट्टने 'गंगूबाई काठियावाडी', 'RRR' आणि 'ब्रह्मास्त्र' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. दुसरीकडे, ऑनलाइन रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्टची एकूण संपत्ती 165 कोटी आहे. अभिनेत्रीचा वांद्रे येथे एक आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत 32 कोटी रुपये आहे. आलिया दर महिन्याला 60 लाख रुपये कमावते असा दावा केला जात आहे. तसेच, ती एका चित्रपटासाठी 8-10 कोटी रुपये घेते.
अधिक वाचा: Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 मध्ये दिसेल ही अभिनेत्री?
लंडनमध्येही घर असल्याचा अहवाल
आलिया भट्ट चित्रपट तसेच ब्रँड प्रमोशन आणि एंडोर्समेंटमधून भरपूर पैसे कमावते. आलियाला प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायला आवडते. नुकतेच अभिनेत्रीने जुहू येथे घर खरेदी केले आहे. तसेच अभिनेत्रीचे लंडनमध्येही घर असल्याची माहिती समोर आली आहे.
अधिक वाचा: 'तू झूठी मै मक्कार'ने आठव्या दिवशीपर्यंत इतक्या कोटींची कमाई, १०० कोटी क्लबमध्ये पोहोचणार
आलियाकडे या लक्झरी वाहनांची रांग
आलिया भट्टला लक्झरी वाहनांचा शौक आहे. अभिनेत्रीच्या कार कलेक्शनमध्ये Audi Q7, Audi Q5, Audi A6, BMW 7 Series, Land Rover, Range Rover, Vogue या लक्झरी कारचा समावेश आहे. या सगळ्याशिवाय आलियाकडे तिची वैयक्तिक व्हॅनिटी व्हॅनही आहे. आलिया आगामी काळात 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', 'तख्त', जी ले जरा यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यासोबतच ही अभिनेत्री 'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
.