National Film Awards: कंगना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, मनोज बाजपेयी आणि धनुष सर्वोत्कृष्ट अभिनेता

सन 2019 साठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आहे. मणिकर्णिका या चित्रपटासाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला आहे.

bollywood national film awards actress kangana ranaut
सुशांत सिंगचा छिछोरे सर्वोत्कृष्ठ राष्ट्रीय चित्रपट 

थोडं पण कामाचं

  • सर्व सिने विश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या 2019 साठीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
  • आज केवळ 2019 मध्ये तयार झालेल्या चित्रपटांसाठीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
  •  ही घोषणा मागील वर्षी 3 मे 2020 रोजी होणार होती.

नवी दिल्ली :  सर्व सिने विश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या 2019 साठीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.  67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या घोषणेसह कंगना राणावत हिला तिच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी वाढदिवसाची भेट मिळाली. कंगना राणावत हिला 'मणिकर्णिका' आणि 'पंगा' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मनोज वाजपेयी याला 'भोसले' या चित्रपटासाठी आणि अभिनेता धनुष यांना 'असुरन' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. यावर्षी सर्वोत्कृष्ट  चित्रपटाचा पुरस्कार (हिंदी) सुशांतसिंग राजपूत यांच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या शेवटच्या 'छिछोरे' या चित्रपटाला मिळाला आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. 

कोरोनामुळे हा  कार्यक्रम  पुढे ढकलला गेला

वर्ष 2020 पूर्णपणे कोरोनाच्या सावट खाली होते.  यामुळे आज केवळ 2019 मध्ये तयार झालेल्या चित्रपटांसाठीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.  ही घोषणा मागील वर्षी 3 मे 2020 रोजी होणार होती.  कोरोना महामारीमुळे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला नव्हता.  आज 2019 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय मीडिया सेंटर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

नॉन-फीचर फिल्म प्रकारातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हिंदी भाषेच्या 'एन इंजीनियर्ड ड्रीम' या चित्रपटाने जिंकला आहे. हे दिग्दर्शन हेमंत गाबा यांनी केले आहे. याशिवाय 'बिर्याणी', 'जोना की पोरबा' (आसामी), 'लता भगवान करे' (मराठी), 'पिकासो' (मराठी) या चार चित्रपटांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार देण्यात आला. 

यावर्षी राष्ट्रीय पुरस्कारांसाठी एकूण 461 चित्रपट पोहोचले. 2019 च्या 'मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट' प्रकारात 13 राज्यांनी भाग घेतला. हा पुरस्कार सिक्कीमला देण्यात आला आहे. 

फीचर फिल्म

सर्वश्रेष्ठ बंगाली फिल्म - गुन्नमी

सर्वश्रेष्ठ हिंदी फिल्म - छिछोरे

सर्वश्रेष्ठ कन्नड़ फिल्म - अक्षी

सर्वश्रेष्ठ मराठी फिल्म - बार्डो

सर्वश्रेष्ठ मणिपुरी फिल्म - ईजी कोना

बेस्ट ओडिया फिल्म - साला बुधर बाडला

सर्वश्रेष्ठ पंजाबी फिल्म - रब दा रेडियो 2

सर्वश्रेष्ठ तमिल फिल्म - असुरन

सर्वश्रेष्ठ तेलुगु फिल्म - जर्सी

बेस्ट छत्तीसगढ़ी फिल्म - भुल्लन दे माजे

सर्वश्रेष्ठ हरियाणवी फिल्म - छोरियां छोरों से कम नहीं होती

बेस्ट खासी फिल्म - लेवुध

बेस्ट मिसिंग फिल्म - अनु रुवाद

बेस्ट पनिया फिल्म - केंजीरा

सर्वश्रेष्ठ तुलु फिल्म - पिंगरा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी