Aalia Bhatt: आलिया 'सडक २'साठी गाणार गाणं; स्क्रॅच व्हर्जन केलं रेकॉर्ड

झगमगाट
Updated Jul 12, 2019 | 22:20 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Aalia Bhatt: आलिया एक चांगली गायिका आहे. ती आता आणखी एका सिनेमात आपल्या आवाजाची जादू घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जुहूच्या एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये तिनं नुकतचं गाण्याचं स्कॅच व्हर्जन रेकॉर्ड केलं.

Alia Bhatt
आलिया भट गाणार गाणं   |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • आलिया भट्ट गाणार आणखी एक गाणं
  • सडक टू सिनेमासाठी केलं गाण्याचं प्राथमिक रेकॉर्डिंग
  • महेश भट्ट करतायत सडक टू सिनेमाचं दिग्दर्शन

मुंबई : बॉलिवूडची सध्याची क्यूट आणि तितकीच गंभीर अभिनेत्री असलेली आलिया भट अष्टावधानी आहे. अभिनय आणि स्टाईलच्याबाबतीत आलियानं सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. पण तिच्यात एक असं टॅलेंट आहे की जे तिला इतरांपासून वेगळं करतं. ते टॅलेंट म्हणजे तिचं गाणं. आलिया एक चांगली गायिका आहे. हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या सिनेमात तिनं मै तेनू समझावाँ जी या गाण्यात तिनं आपण चांगली गायिका असल्याचं सिद्ध केलंय. आता आलिया आणखी एका सिनेमात आपल्या आवाजाची जादू प्रेक्षकांना दाखवणार आहे. तिच्या आगामी सडक २ सिनेमामध्ये आलियाच्या आवाजात एक गाणं असणार आहे. जुहूच्या एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये तिनं नुकतचं त्या गाण्याचं स्क्रेच व्हर्जन रेकॉर्ड केलंय फायनल गाणं अद्याप रेकॉर्ड करण्यात आलेलं नाही.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

?

A post shared by Alia ? (@aliaabhatt) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Got that sushine in my pocket ??

A post shared by Alia ? (@aliaabhatt) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

soul full of sunshine ?

A post shared by Alia ? (@aliaabhatt) on

 

शुटिंगनंतर मुख्य रेकॉर्डिंग

एका वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार जीत गांगुली या गाण्याची तयारी करत आहेत. या गाण्याच्या शब्दांवर अजून काम सुरू आहे. जीत आलियाच्या आवाजाचा पोत समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यानं तिच्या आवाजात स्क्रॅच रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला. आता गाण्याचे शब्द लिहून झाल्यानंतर महेश भट्ट यांना दाखवण्यात येणार आहेत. हे एक रोमँटिक गाणं असणार आहे. सिनेमात एका महत्त्वाच्या टप्प्यावर हे गाणं येणार आहे. त्यामुळे महेश भट्टदेखील यावर खूप गांभीर्यानं विचार करत आहेत. ऑगस्टमध्ये सिनेमाचं ऊटीमध्ये शुटिंग शेड्युल लावण्यात आलंय. हे शेड्युल संपवल्यानंतरच गाण्याचा फायनल ट्रॅक रेकॉर्ड केला जाणार आहे. स्क्रेच व्हर्जन हा एक निव्वळ ऑडिओ पिस असतो. संगीतकार आणि ऑडिओ इंजिनीअर्स यांना हव्या असणाऱ्या रेफरन्ससाठी स्क्रेच व्हर्जन रेकॉर्ड केले जाते. वेगळ्या धाटणीच्या आलियाच्या आवाजात गाणं ऐकणं निश्चित उत्सुकता वाढवणारं आहे. यापूर्वी आलियानं हायवे, उडता पंजाब, डियर जिंदगी आणि बद्रिनाथ की दुल्हनिया या सिनेमांमध्येही गाणं गायलं आहे.

बिझी आलिया

सडक टूच्या निमित्तानं आलिया पहिल्यांदाच वडील महेश भट्ट यांच्यासोबत काम करणार आहे. तर, महेश भट्ट जख्म सिनेमानंतर सडक २ मधून दिग्दर्शनात पुनरागमन करत आहेत. या सिनेमात आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि पुजा भट्ट यांच्याही प्रमुख भूमिका असणार आहेत. आलिया अयान मुखर्जीच्या ब्रम्हास्त्रमध्येही काम करत आहे. त्यात पहिल्यांदाच ती बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन आणि डिंपल कपाडिया यांच्या भूमिका असणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Aalia Bhatt: आलिया 'सडक २'साठी गाणार गाणं; स्क्रॅच व्हर्जन केलं रेकॉर्ड Description: Aalia Bhatt: आलिया एक चांगली गायिका आहे. ती आता आणखी एका सिनेमात आपल्या आवाजाची जादू घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जुहूच्या एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये तिनं नुकतचं गाण्याचं स्कॅच व्हर्जन रेकॉर्ड केलं.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola