Bollywood News: मिशन मंगलबरोबर बाटला हाऊसचीही बॉक्स ऑफिसवर कमाई

झगमगाट
Updated Aug 19, 2019 | 20:57 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Bollywood News: मिशन मंगलच्या तुलनेत फारशी चांगली सुरुवात न झालेला बाटला हाऊस आता चौथ्या दिवसानंतर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. आता हा सिनेमा १०० कोटी क्लबमध्येही जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त होत आहे.

batla house
बाटला हाऊसचीही बॉक्स ऑफिसवर कमाई  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • बॉक्स ऑफिसवर बाटला हाऊस सिनेमाचीही चांगली कमाई; मिशन मंगल सिनेमाला जोरदार टक्कर
  • बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी रिलीज झाले दोन सिनेमे; बाटला हाऊसची संथ सुरुवात
  • बाटला हाऊस सिनेमाला चौथ्या दिवसापासून मिळतोय चांगला प्रतिसाद

मुंबई : यंदा १५ ऑगस्टला बॉलिवूडमध्ये मिशन मंगल आणि बाटला हाऊस हे दोन सिनेमे आमने-सामने आले. मिशन मंगलच्या तुलनेत बाटला हाऊसला कमी रिस्पॉन्स असला तरी जॉन अब्राहमच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांना हा सिनेमा आवडत आहे. मिशन मंगलच्या तुलनेत फारशी चांगली सुरुवात न झालेला बाटला हाऊस आता चौथ्या दिवसानंतर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने १४.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. आता हा सिनेमा १०० कोटी क्लबमध्येही जाऊ शकतो, असा अंदाज जाणकार व्यक्त करू लागले आहेत. जॉन अब्राहमचा अभिनय आणि जबरदस्त अॅक्शन हा या सिनेमाचा यूएसपी आहे. हा सिनेमा पाहणाऱ्या प्रत्येकाला तो आवडत असल्यामुळे माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर सिनेमा चांगली कमाई करण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही वर्षांतील जॉनचा हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा होण्याची शक्यता आहे.

 

 

रविवारपासून घेतली पकड

बाटला हाऊसने रविवारपासून बॉक्स ऑफिसवर पकड घेतली आहे. पहिल्या दिवशी १४.५९ कोटी कमावणारा हा सिनेमा दुसऱ्या दिवशी केवळ ८.८४ कोटी रुपयेच मिळवू शकला. पण, तिसऱ्या दिवशी सिनेमाने १०.९० तर, चौथ्या दिवशी १२.७० कोटी रुपये मिळवले आहेत. आतापर्यंत सिनेमाने एकूण ४७.९९ कोटी रुपये मिळवले आहेत. बॉलिवूडमधू मिळालेल्या माहितीनुसार सिनेमाला उत्तर प्रदेश, दिल्ली या पट्ट्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाची कथा ही दिल्लीतील एका एन्काऊंटवरची असल्याने त्यात भागात या सिनेमाची खूप चर्चा आहे.

 

 

जॉन पडतोय भारी

दुसरीकडे मिशन मंगलही १५ ऑगस्ट दिवशीच रिलीज झाली होती. सिनेमाचं प्रमोशन खूप चांगलं झाल्यामुळं पहिल्या दिवसापासून सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. सध्या मिशन मंगल १०० कोटी क्लबमध्ये जाण्याचापासून काही पावले दूर आहे. हा सिनेमा मल्टिस्टारर आहे. अक्षय कुमारसोबत सिनेमात दिलीप ताहील, विद्या बालन, तापसी पन्नू, शरमन जोशी, सोनाक्षी सिन्हा, क्रिती कुल्हारी आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या सिनेमाने ९७ कोटी रुपये मिळवले असले तरी, या सिनेमाच्या तुलनेत बाटला हाऊस केवळ एकट्या जॉन अब्राहमच्या जादूवर चालला आहे. त्यामुळं मिशन मंगलच्या टीमवर जॉन अब्राहम भारी पडत असल्याची चर्चा आहे. दिल्लीतील केएल १८ बाटला हाऊसमध्ये २००८मध्ये एक एन्काऊंटर झाला होता. त्यात इंडियन मुजाहिद्दीनच्या संशयित दहशतवाद्या्ंना ठार करण्यात आलं होतं. दोन दहशतवादी ठार झाले तर, दोघे पळून गेले होते. डीसीपी संजीव कुमार यादव यांनी हा एन्काऊंटर केला होता. बाटला हाऊसमध्ये जॉन अब्राहमने डीसीपी संजीव कुमार यादव यांची मुख्य भूमिका केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...