[Suhana Photo]: किंग खानची कन्या सुहाना करणार बॉलिवूडमध्येच करिअर; हे आहेत संकेत

झगमगाट
Updated Aug 03, 2019 | 19:12 IST | टाइम्स नाऊ हिंदी

[Suhana Photo]: किंग खानची मुलगी सुहाना बॉलिवूडमध्ये करिअर करणार असल्याचं निश्चित झालंय. तिच्या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये अॅक्टिंगसाठीचं तिचं डेडिकेशन स्पष्ट दिसत आहे. या फोटोंमुळे सुहानाचे कौतुकही होत आहे.

Suhana Khan bollywood
सुहाना खान बॉलिवूडमध्येच करणार करिअर   |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • किंग खान शाहरूखची मुलगी बॉलिवूडमध्येच करणार करिअर
  • सोशल मीडियावर व्हायरल झाले सुहाना खानचे नाटकाच्या तालमींचे फोटो
  • सुहाना जाणून घेतेय अभिनयातील बारकावे
  • करण जोहर करणार सुहाना खानला लाँच?

मुंबई : बॉलिवूडची स्टार किड् म्हणून ओळखली जाणारी सुहाना खान गेल्या काही दिवसांत या ना त्या निमित्ताने सतत चर्चेत असते. तिचे काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर पहायला मिळाले आहेत. हे फोटो वेगाने व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोच्या माध्यमातून सुहाना बॉलिवूडमध्ये करिअर करणार असल्याचं निश्चित झालंय. फोटोमध्ये अॅक्टिंगसाठीचं तिचं डेडिकेशन स्पष्ट दिसत आहे. केवळ काही फोटोंवरूनच सुहाना चंदेरी पडद्यावर धमाल करणार असल्याचं जाणकारांचं मत आहे. अर्थात सोशल मीडियावरही तिच्या या फोटोचं खूप कौतुक झालंय. सुहानाचे हे फोटो तिच्या कॉलेजमधील आहेत. तिच्या ग्रॅज्युएशनपूर्वीचे हे फोटो असल्याचं सांगितलं जातंय. त्यामध्ये ती एका नाटकाच्या तालमीत काम करताना दिसत आहे. तिच्यासोबत तिचे काही सहकारी मित्र-मैत्रिणीही दिसत आहेत. त्याच्यासोबत सुहाना नाटकाच्या तालमी करत आहे. त्यातील हालचाली आणि एका एका स्टेपवर सुहाना बारकाईनं काम करत असल्याचं दिसत आहे.

A post shared by Suhana Khan (@suhanakhanoffcial) on

❤️

A post shared by Suhana Khan (@suhanakhanoffcial) on

बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री

सोशल मीडियावर शेअर झालेल्या या फोटोंवरून सुहाना बॉलिवूडमध्येच आपलं करिअर करण्यासाठी तयार असल्याचं मानलं जात आहे. सुहाना सध्या केवळ १९ वर्षांची आहे. तिनं नुकतचं आपलं कॉलेज पूर्ण केलंय. केवळ १९ वर्षांची असतानाच तिनं वॉग मॅगझीनच्या कव्हर पेजवर येण्याचा मान मिळवलाय. सुहानाचा आणखी एक फोटो समोर आला आहे. त्यात ती बॅले ट्रेनरसोबत दिसत आहे. सध्या ती बॅले डान्सचं स्पेशल ट्रेनिंग घेत आहे. किंग खानची ही कन्या वडिलांची खूप लाडकी आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरही तिचे खूप फॅन्स आहेत.

??

A post shared by Suhana Khan (@suhanakhanoffcial) on

अनन्या पांडे बेस्ट फ्रेंड

सुहाना लंडनमध्ये होती तेव्हा तिचे फोटो काही मिनिटांत व्हायरल होत होते. सध्या सुहाना कुटुंबासमवेत व्हेकेशनवर आहे. त्यावेळचे काही फोटो स्वत: शाहरूख खानने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये सुहानाच नव्हे, तर शाहरूख खान त्याची पत्नी गौरी, आर्यन खान आणि अबरामही दिसत आहे. रियल लाईफमध्ये शाहरूखची कन्या सुहाना आणि चंकी पांडेची कन्या अनन्या बेस्ट फ्रेंड्स आहेत. अनन्यासारखंच सुहानाही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं मानलं जातयं. अनन्या करण जौहरच्या स्टुडंट्स ऑफ द इयर 2 मध्ये दिसली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नाही. करण जोहरने स्टुडंट्स ऑफ द इयरमधून आलिया भटला ही एन्ट्री दिली होती. शाहरूख खान आणि करण जोहर यांचे संबंध खूप चांगले असल्यामुळे आता सुहानाही करण जोहरच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
[Suhana Photo]: किंग खानची कन्या सुहाना करणार बॉलिवूडमध्येच करिअर; हे आहेत संकेत Description: [Suhana Photo]: किंग खानची मुलगी सुहाना बॉलिवूडमध्ये करिअर करणार असल्याचं निश्चित झालंय. तिच्या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये अॅक्टिंगसाठीचं तिचं डेडिकेशन स्पष्ट दिसत आहे. या फोटोंमुळे सुहानाचे कौतुकही होत आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या लग्नातील न पहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल 
ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या लग्नातील न पहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल 
forbes 2019: फोर्ब्स लिस्टमध्ये अक्षय कुमारचा दबदबा, सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांना मागे टाकले
forbes 2019: फोर्ब्स लिस्टमध्ये अक्षय कुमारचा दबदबा, सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांना मागे टाकले
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
Mission Mangal Day 6 collection: मिशन मंगल सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड सुरुच, जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
Mission Mangal Day 6 collection: मिशन मंगल सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड सुरुच, जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली