आलिशान 3 BHK फ्लॅटपेक्षा कमी नाही शिल्पाची नवी Vanity Van; व्हिडिओ पाहून चक्रावतील डोळे

झगमगाट
पूजा विचारे
Updated Jul 19, 2022 | 13:12 IST

बी- टाऊनमधील (B-Town) श्रीमंत अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Bollywood actress Shilpa Shetty) ही समावेश आहे. त्यात अभिनेत्री एका गोष्टीमुळे बरीच चर्चेत आहे.

Shilpa Vanity
शिल्पा शेट्टीची आलिशान Vanity Van  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीनं एक नवीन व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली आहे.
  • शिल्पाच्या व्हॅनिटी व्हॅनचे (Shilpa's Vanity Van) फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
  • शिल्पाच्या या व्हॅनमध्ये बेड, सोफा सेट आणि आलिशान बाथरूमचा समावेश आहे.

मुंबई: बॉलिवूडमध्ये (Bollywood)  प्रत्येक अभिनेत्री ही श्रीमंत आहे. प्रत्येक अभिनेत्रींची एक वेगळी ओळख आहे. त्यातच बी- टाऊनमधील (B-Town)  श्रीमंत अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Bollywood actress Shilpa Shetty)  ही समावेश आहे. त्यात अभिनेत्री एका गोष्टीमुळे बरीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीनं एक नवीन व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली आहे. शिल्पाच्या व्हॅनिटी व्हॅनचे (Shilpa's Vanity Van)  फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. शिल्पाच्या या व्हॅनमध्ये बेड, सोफा सेट आणि आलिशान बाथरूमचा समावेश आहे. शिल्पाची 3 BHK व्हॅनिटी व्हॅन पाहिल्यावर कोणाचेही डोळे चक्रावून जातील. 

व्हॅनमधलं लग्झरी वॉशरूम

बॉलिवूड स्टार असो किंवा हॉलिवूड स्टार, प्रत्येक स्टारची स्वतःची लग्झरी व्हॅनिटी व्हॅन असते. शूटिंग दरम्यान व्हॅनिटी व्हॅनमध्ये स्टार्स अनेकदा मेकअप तर करतातच पण काही वेळा आरामासाठी ही त्याचा वापर करतात. 

अधिक वाचा-  RBI चा महाराष्ट्रातील  'या' सहकारी बँकेला दणका; काढता येणार फक्त इतके पैसे

मात्र अभिनेत्री शिल्पा शेट्टीची ही व्हॅनिटी व्हॅन खूपच खास आहे. ही व्हॅनिटी व्हॅन अत्यंत लग्झरी आहे. शिल्पाच्या या व्हॅनिटी व्हॅनमध्ये दोन बाथरूम आहेत. त्यातच एक बाथरूम खूप मोठं आहे ज्यात हेअर स्पा आणि हेअर वॉश आरामात करू शकता. याव्यतिरिक्त एक छोटं वाशरूम आहे. 

मीटिंग रूम 

शिल्पा शेट्टीच्या व्हॅनिटी रूममध्ये मीटिंग रूम देखील आहे. अनेकदा व्हॅनिटी व्हॅनमध्ये मीटिंग रूम नसते. शिल्पाच्या या व्हॅनिटी व्हॅनमध्ये असलेल्या मीटिंग रूममध्ये एक आलिशान सोफा ठेवण्यात आला आहे.

किचन 

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या व्हॅनिटी व्हॅनचे इंटीरियर डिझाइन अतिशय जबरदस्त आहे. व्हॅनिटी व्हॅनमध्ये किचन देखील आहे. व्हॅनमधील किचनची रचना अतिशय लग्झरी आहे. 

टेरेस गार्डन 

व्हॅनिटी व्हॅनमध्ये शिल्पा शेट्टीसाठी खास टेरेस गार्डन तयार करण्यात आलं आहे. शिल्पा स्वतःचे आरोग्य आणि फिगर टिकवून ठेवण्यासाठी योगा करते. अशा परिस्थितीत अभिनेत्रीला सहज योगा करता यावा म्हणून तिच्या व्हॅनिटी व्हॅनवर टेरेस गार्डन बनवण्यात आलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी