Bollywood: विवेक ओबेरॉयच्या ट्विटवर सलमान काय म्हणाला पाहा!

झगमगाट
Updated May 21, 2019 | 23:09 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Bollywood: विवेक ओबेरॉयच्या वादग्रस्त ट्विटपासून सलमान खाननं स्वतःला दूर ठेवल्याचं दिसत आहे. 'विवेकचं ट्विट मी पाहिलच नाही तर, मी तुम्हाला उत्तर काय देऊ,' अशा आशयाची प्रतिक्रिया सलमान खान यानं दिली आहे.

Salman Khan reaction on Vivek oberoi twitter post
सलमान खान  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: एक्झिट पोलचा संदर्भ घेऊन व्हायरल झालेले मिम ट्विटरवर बिनधास्त शेअर करणारा अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या अडचणीत आला आहे. महिला आयोगाची नोटिस, सोशल मीडियावर ट्रोलिंग, राजकीय पक्षांकडून आलेला दबाव या सगळ्या पार्श्वभूमीवर विवेकनं माफी मागितली असली तरी, त्याच्या विषयी अनेकाचं मन गढूळ झालं आहे. आता या प्रकरणाचा संदर्भ घेऊन बॉलीवूडमधल्या प्रत्येक कलाकाराला याविषयी प्रतिक्रिया विचारल्या जात आहेत. आता त्या मिममध्ये असलेल्या खुद्द सलमान खानला यावर कोणी प्रतिक्रिया विचारली नाही तर तो महा आळशी म्हणावा लागेल. अर्थातच त्याला प्रतिक्रिया विचारण्यात आली. पण, त्याने एकूणच या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं आहे. गेली अनेक वर्षे तो विवेक ओबेरॉयवर कोणतीही प्रतिक्रिया देण्याचं टाळत आला आहे. यावेळीही त्यानं तोच कित्ता गिरवला आहे आणि आपला कूल अंदाज कायम ठेवला आहे.

विवेकचा माफिनामा

एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर एक मिम शेअर झाले होते. त्यात ऐश्वर्या रायच्या भुतकाळातील खासगी आयुष्याचा वापर करून एक्झिट पोलची खिल्ली उडवण्यात आली होती. पण, हे मिम एखाद्याच्या खासगी आयुष्याची खिल्ली उडवणारं असल्यामुळं त्यावर खूपच टीका होत होती. त्यातच विवेक ओबेरॉयनं ते ट्विट केलं. यात कोणताही राजकीय हेतू नसल्याचं त्यांने ट्विटमध्ये म्हटलं होतं. या मिममध्ये पहिल्या फोटोमध्ये सलमान खान सोबत ऐश्वर्याचा फोटो आहे. त्याला ओपिनियन पोल असं म्हटलं होतं. दुसऱ्या फोटोत ऐश्वर्या विवेक ओबेरॉयसोबत असून, त्या फोटोला एक्झिट पोल म्हटलं होतं आणि तिसऱ्या फोटोत अभिषेक बच्चन - ऐश्वर्याच्या सहकुटुंब फोटोला रिझल्ट असं म्हटलं होतं. यावरून सोशल मीडिया आणि एकूणच बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली होती. प्रकरण राज्य महिला आयोगाकडे गेलं. राष्ट्रवादी काँग्रेसने याची दखल घेऊन आंदोलनाचा इशाराही दिला होता. विवेक ओबेरॉयवर चारही बाजूंनी टीका होऊ लागल्यानंतर त्यानं ते वादग्रस्त ट्विट डिलिट करून टाकलं आणि जाहीर माफीही मागितली.

मी याकडं लक्ष देत नाही : सलमान

या सगळ्यावर सलमान खानला प्रतिक्रिया विचारली असता तो म्हणाला, ‘मी हल्ली सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नाही. मी हल्ली लक्षच देत नाही. पूर्वीसारखं मी ट्विटरवर सक्रीय नसतो. मी काम करू की हे सगळं बघू. मी आजिबात याकडं लक्ष देत नाही.’ या प्रतिक्रियेतून सलमान खाननं या वादापासून स्वतःला दूर ठेवल्याचं दिसत आहे. सलमान आणि ऐश्वर्या यांच्या रिलेशनशीपची एकेकाळी खूप चर्चा होती. पण, ते नातं पुढं जाऊ शकलं नाही. त्यानंतर ऐश्वर्याच्या विवेक ओबेरॉयशी असलेल्या मैत्रीची चर्चा होती. त्यावेळी सलमान ऐश्वर्याला आणि आपल्याला धमक्या देत असल्याचं विवेकनं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. त्यानंतर विवेकला बॉलीवूडमध्ये काम मिळणं कमी झालं होतं. त्या सगळ्या प्रकारानंतर सलमान खान विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय या दोन व्यक्तींसंदर्भात कोणतेही भाष्य करत नाही. आजही त्याने तेच करून स्वतःला त्यापासून दूर ठेवलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Bollywood: विवेक ओबेरॉयच्या ट्विटवर सलमान काय म्हणाला पाहा! Description: Bollywood: विवेक ओबेरॉयच्या वादग्रस्त ट्विटपासून सलमान खाननं स्वतःला दूर ठेवल्याचं दिसत आहे. 'विवेकचं ट्विट मी पाहिलच नाही तर, मी तुम्हाला उत्तर काय देऊ,' अशा आशयाची प्रतिक्रिया सलमान खान यानं दिली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles