मुंबई: Vicky Kaushal And Katrina Kaif Death threats: आजकाल बॉलिवूड स्टार्सशी सोशल मीडियावर सहज संपर्क साधता येतो. इतंकच काय तर त्यांचे अपडेट ही सहज मिळून जातात. त्यामुळे यूझर्स सेलिब्रेटींना सोशल मीडियावर (social media) स्टॉक करत असतात. आता एकानं बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला स्टॉक केल्याचं समोर येतेय. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि त्याची पत्नी आणि अभिनेत्री कतरिना कैफला (Bollywood actress Katrina Kaif) जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या प्रकरणी विकी कौशल पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. विकीनं अज्ञात लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
आदित्य राजपूत नावाचा एक व्यक्ती सोशल मीडियावर कतरिनाचा बराच काळ स्टॉक करत होता. विक्की कौशलनेही त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न केला होता, तरीही तो असेच करत राहिला आणि शेवटी विकी कौशलला हे पाऊल उचलावं लागलं. अभिनेता विकी कौशलनं सांताक्रूझ (Santacruz) पोलीस स्टोशनमध्ये या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
अधिक वाचा- उभ्या असलेल्या बसनं दिली दुसऱ्या बसला धडक, 8 ठार; 35 हून अधिक जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, विकीची पत्नी कतरिना कैफला एक व्यक्ती सोशल मीडियावर स्टॉक करत होता. या व्यक्तीच्या विरोधात विकीनं पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
आदित्य राजपूत नावाचा एक मुलगा सोशल मीडियावर कतरिना कैफला स्टॉक करत होता. आदित्यला विकीनं उत्तर देताच त्यानं विकीला धमकी देण्यास सुरूवात केली. त्यानंतर विकीनं सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये आदित्यच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Maharashtra | Police register a case against an unidentified man and initiate an investigation for allegedly giving life threats to actors Katrina Kaif and Vicky Kaushal through social media. Case registered at Santacruz Police Station: Mumbai Police — ANI (@ANI) July 25, 2022
(File photos) pic.twitter.com/hQTaTMnB9a
विकी-कतरिना यांचं वर्कफ्रंट
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच 'फोन भूत' या सिनेमा अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत दिसणार आहे, हा सिनेमा 4 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर विकीचा गोविंदा नाम मेरा हा सिनेमा देखील लवकरच रिलीज होणार आहे.
विकी आणि कतरिना यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सिक्स सेन्स फोर्ट, बरवारा, सवाई माधोपूर येथे लग्न केले होते. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वीच कतरिनानं आपला 39 वा वाढदिवस साजरा केला. तसंच कतरिना कैफनं गेल्या सहा महिन्यात आशियातील सर्वात जास्त वेळा सर्च करण्यात आलेल्या सेलिब्रीटींच्या यादीत सातव्या स्थान मिळवलं आहे.
सलमान खानला ही मिळाली होती धमकी
सलमान धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली होती. बॉलीवूड न्यूजनुसार, सलमानच्या प्रकरणी देखील मुंबई पोलिसांच्या एका टीमने दिल्ली गाठून तिहार तुरुंगात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली होती. मात्र त्याने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली असलेल्या बाब नाकारली. मात्र ही धमकी कोणी दिली होती, याचे सत्य नंतर समोर आले.