अमिताभ बच्चन, शाहरुख खान, रणवीर सिंग आणि अजय देवगण यांच्या अडचणीत वाढ, गुटख्याची जाहिरात केल्याप्रकरणी मुझफ्फरपूरमध्ये गुन्हा

मुझफ्फरपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्मीने जाहिरातींमध्ये गुटख्याचा प्रचार केल्याप्रकरणी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, रणवीर सिंग आणि अजय देवगण यांसारख्या बॉलिवूड कलाकारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर 27 मे रोजी कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

Case filed against Amitabh Bachchan, Shahrukh Khan, Ranveer Singh and Ajay Devgan in Muzaffarpur for advertising gutkha
अमिताभ बच्चन, शाहरुख खान, रणवीर सिंग आणि अजय देवगण यांच्या अडचणीत वाढ, गुटख्याची जाहिरात केल्याप्रकरणीमुझफ्फरपूरमध्ये गुन्हा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण ट्रोल
  • आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • पान मसाला जाहिरात प्रकरणी सुनावणी

मुंबई : मुझफ्फरपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्मीने जाहिरातींमध्ये गुटख्याचा प्रचार केल्याप्रकरणी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, रणवीर सिंग आणि अजय देवगण यांसारख्या बॉलिवूड कलाकारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर 27 मे रोजी कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. (Case filed against Amitabh Bachchan, Shahrukh Khan, Ranveer Singh and Ajay Devgan in Muzaffarpur for advertising gutkha)

अधिक वाचा : 

ED च्या रडारवर राज कुंद्रा, पॉर्न रॅकेट प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या पतीची आणखी अनेक सिक्रेट, जाणून घ्या A टू Z

 गेल्या काही आठवड्यांपासून, तंबाखू आधारित उत्पादने किंवा गुटख्याचा प्रचार करणाऱ्या जाहिरातींमध्ये काही बॉलीवूड कलाकारांवर टीका होत आहे. त्याचबरोबर अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना या जाहिरातींसाठी निर्दयीपणे ट्रोल केले जात आहे. बिग बींनी पान मसाला जाहिरातीतून माघार घेतली आणि अक्षय कुमार एका कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून पायउतार झाला.

अधिक वाचा : 

Alia Bhatt : आलिया भट्ट हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी रवाना, अर्जून कपूरची खास कमेंट

जाहिरातींमध्ये गुटख्याचा प्रचार केल्याबद्दल बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, रणवीर सिंग आणि अजय देवगण यांच्याविरुद्ध मुझफ्फरपूर येथील कार्यकर्त्या तमन्ना हाश्मी यांनी कलम ४६७, ४६८, ४३९, १२०बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हाश्मीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, या बॉलीवूड स्टार्सनी आपल्या लोकप्रियतेचा गैरवापर करून गुटख्याची जाहिरात केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी