मुंबई: आता मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्या कलाकारांसाठी हक्काचं व्यासपीठ सुरू झालं आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रादेशिक कलाकारांना मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी नवीन व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लायनगेज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं हा प्रयत्न केला आहे. कास्टिंग वाईब हे टॅलेंट आणि कास्टिंग चे डिजिटल व्यासपीठ त्यांनी या प्रादेशिक कलाकारांसाठी तयार करण्यात आलं आहे आणि ते सुद्धा पूर्णपणे मोफत.
कास्टिंग वाईब सुरू करण्यामागचा हेतू
गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशातील चित्रपट उद्योग आणि त्याच्याशी निगडित इतर टीव्ही आणि ओटीटी माध्यमांची झपाट्यानं वाढ होताना दिसतेय. भारत देश हा आजच्या घडीला जगात सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश ठरतोय. त्यामुळे या क्षेत्रांशी निगडित अभिनय, दिग्दर्शन, पटकथा लेखन, सिनेमॅटोग्राफी, संकलन, ध्वनी, संगीत, नृत्य दिग्दर्शन, ग्राफिक्स इ. वेगवेगळ्या विभागांमध्ये करिअर करण्याच्या उत्तम संधी आज उपलब्ध आहेत.
अधिक वाचा- अन् दोन वर्षाच्या भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन बसला चिमुकला, वडील शोधत राहिले रूग्णवाहिका
देशात जरी या क्षेत्रात बऱ्याच संधी उपलब्ध असल्या तरीही सुद्धा प्रादेशिक विभागातल्या अनेक विद्यार्थ्यांना किंवा कलाकारांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे त्यांना अनेक वेळा त्यात अपयश येतं. अशा परिस्थितीत प्रादेशिक कलाकारांना अभिनय
क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते.
सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपलं गाव सोडून मोठं-मोठ्या शहरात येऊन राहावं लागतं. त्यानंतर त्यांना काम शोधण्याची आणखी वेगळी मेहनत घ्यावी लागते. त्यातच गेल्या 2 वर्षात कोविडच्या प्रादुर्भावांमुळे प्रादेशिक कलाकारांचा हा प्रवास आणखीच खडतर झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या आणि कलाकारांमध्ये अभिनयाचं कौशल्य आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी असते. मात्र तरीही मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणं अवघड होऊन जातं आणि हीच गोष्ट स्वप्नवत होऊ लागली आहे.
या लिंकवर करा रजिस्ट्रेशन
कास्टिंग वाईब या व्यासपीठावर अनेक आघाडीच्या कलाकारांनी स्वतःच्या प्रोफाइल तयार केल्या आहेत . या व्यासपीठावर प्रोफाइल बनवण्यासाठी तुम्हाला https://castingvibe.com/ यवेबसाईटला व्हिजीट करावी लागेल. या वेबसाईटवर टॅलेंट रजिस्ट्रेशन या टॅब वर जाऊन स्वतःची मोफत प्रोफाइल बनवता येणार आहे.
कास्टिंग वाईब व्यासपीठ काय आहे?
चित्रपटामध्ये कथेच्या आणि भूमिकेच्या गरजेनुसार योग्य ते अभिनेते आणि अभिनेत्री यांची निवड करण्यात येते. तसंच अनेक छोट्या- मोठ्या भूमिकांसाठी चांगल्या कलाकारांची ही गरज असते. मात्र अशी परिस्थिती निर्माण होते की, आजही अनेक प्रादेशिक कलाकार अंगात सर्व गुण असून सुद्धा मनोरंजन क्षेत्रातील योग्य त्या व्यक्तींपर्यंत पोहोचू शकत नाहीत. अनेक वेळा ऑडिशन्स नेमक्या कुठे सुरू आहेत, याबाबत कोणतीही योग्य माहिती उपलब्ध नसते. याबाबत एक पद्धत (सिस्टिम) असणे खरंच गरजेचं होतं. म्हणूनच कास्टिंग वाईब ची निर्मिती करण्यात आली आहे.
अधिक वाचा- विजय मल्ल्याला धक्का; तुरूंगवासासह ठोठावला दंड, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
कास्टिंब वाईब कसं करणार काम?
कास्टिंग वाईब हे डिजिटल टॅलेंट आणि कास्टिंग व्यासपीठ आहे. ज्यावर मनोरंजन क्षेत्रातील कलाकार आणि त्याचबरोबर तंत्रज्ञ स्वतःची एक मोफत प्रोफाइल बनवू शकणार आहेत. या प्रोफाइलमध्ये त्या कलाकार किंवा तंत्रज्ञचे सोशल मीडिया संपर्क, त्या कलाकार किंवा तंत्रज्ञ यांच्याबद्दल खाजगी आणि व्यवसायिक माहिती, कामाचा अनुभव, स्वतःचे आणि कामाचे फोटोस आणि व्हिडिओ असे सर्व काही एकाच लिंक वर उपलब्ध होणार आहे. त्याच बरोबर या कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी ऑडिशन आणि इतर कामाच्या निवड प्रक्रियेबद्दल सुद्धा माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सर्व माहिती निशुल्क असणार आहे. त्याचबरोबर यावर बनलेल्या प्रोफाइल या विविध निर्मिती संस्था, टीव्ही वाहिनी आणि ओटीटी माध्यमांपर्यंत मोफत पोहोचवली जाणार आहे. हे व्यासपीठ कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मिती संस्था, टीव्ही वाहिनी आणि ओटीटी माध्यम यांच्यातील एका ब्रिजचे काम करणार आहे.