Chhello Show Oscars 2023 : छेलो शो या गुजराती चित्रपटाची ऑस्करसाठी भारताची ऑफिशियल एन्ट्री, कश्मीर फाईल्स आणि RRR ला झटका

Chhello Show Oscars 2023 : गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती की २०२२ साठी परदेशी भाषेच्या कॅटेगरीतून भारताचा कुठला चित्रपट ऑस्करसाठी जाणार.या यादीत RRR आणि कश्मीर फाईल्स या नावांची चर्चा सुरू होती. परंतु या दोन्ही मोठ्या चित्रपटांना मागे ठेवत गुजराती चित्रपट छेलो शो ने बाजी मारत भारतासाठी ऑस्करमध्ये ऑफिशियल एन्ट्री मिळवली आहे.

chello show
छेलो शो या गुजराती चित्रपट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती की २०२२ साठी परदेशी भाषेच्या कॅटेगरीतून भारताचा कुठला चित्रपट ऑस्करसाठी जाणार.
  • या यादीत RRR आणि कश्मीर फाईल्स या नावांची चर्चा सुरू होती.
  • परंतु या दोन्ही मोठ्या चित्रपटांना मागे ठेवत गुजराती चित्रपट छेलो शो ने बाजी मारत भारतासाठी ऑस्करमध्ये ऑफिशियल एन्ट्री मिळवली आहे.

Chhello Show Oscars 2023 : मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती की २०२२ साठी परदेशी भाषेच्या कॅटेगरीतून (Foreign Language category) भारताचा कुठला चित्रपट ऑस्करसाठी (oscar) जाणार.या यादीत RRR (RRR Movie) आणि कश्मीर फाईल्स (Kasmir Files) या नावांची चर्चा सुरू होती. परंतु या दोन्ही मोठ्या चित्रपटांना मागे ठेवत गुजराती चित्रपट (gujarati movie) छेलो शो (Last show) ने बाजी मारत भारतासाठी ऑस्करमध्ये ऑफिशियल एन्ट्री मिळवली आहे. (chello show gujrati movie official entry for Oscar)

अधिक वाचा :  Sapna Chaudhary : सपना चौधरीला लखनौ कोर्टाने ताब्यात घेतले, फसवणूक प्रकरणात केले आत्मसमर्पण

चित्रपटाची प्रशंसा

पॅन नलीन यांनी छेलो शो या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात भाविन रबारी, भावेश श्रीमाली, ऋचा मीणा, दीपेन रावल आणि परेश मेहता यांची प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट वयात येणार्‍या एका मुलाच्या आयुष्यावर असून २०२१ साली ट्रिबेका फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाची पहिली स्क्रीनींग झाली होती. अनेक पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाचे स्क्रीनींग झाल्यानंतर या चित्रपटाची खूप प्रशंसा झाली होती.

अधिक वाचा :  Attack on Actor : अभिनेता इमरान हाश्मीवर जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक, हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल

चित्रपटाचे कथानक

गुजरातचा चहाला गावातील एक ९ वर्षाचा मुलगा समय चित्रपट पाहण्यासाठी जातो. चित्रपट पाहून तो चित्रपटाच्या प्रेमात पडतो आणि चित्रपट या माध्यमात तो तो तल्लीन होऊन जातो. समय भोवती या चित्रपटाचे कथानक फिरत असते.

अधिक वाचा :  Brahmastra Box Office Collection: दुसऱ्या सोमवारी 'ब्रह्मास्त्र'च्या कमाईनं वाढवली चिंता, जाणून घ्या 11व्या दिवसाचं कलेक्शन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी