Lock Upp: मुनव्वर फारुकीच्या आईने ऍसिड पिऊन केली होती आत्महत्या, मुनव्वरने कार्यक्रमात दिली माहिती

कॉमेडियन मुनव्वर फारुकीने टीव्ही शो लॉक अपमध्ये धक्कादायक माहिती दिली आहे. आपल्या आईने ऍसिड पिऊन आत्महत्या केल्याचे मुनव्वरने सांगितले आहे. मुनव्वर फारुकीचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा आहे ही माहितीनी एका एपिसोडमध्ये कळाल्यानंतर प्रेक्षकांना धक्का बसला होता. 

munawar farooqui
मुनव्वर फारुकी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कॉमेडियन मुनव्वर फारुकीने टीव्ही शो लॉक अपमध्ये धक्कादायक माहिती दिली आहे.
  • आपल्या आईने ऍसिड पिऊन आत्महत्या केल्याचे मुनव्वरने सांगितले आहे.
  • मुनव्वर फारुकीचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा आहे ही माहितीनी एका एपिसोडमध्ये कळाल्यानंतर प्रेक्षकांना धक्का बसला होता. 

munawar faruqui : कॉमेडियन मुनव्वर फारुकीने टीव्ही शो लॉक अपमध्ये धक्कादायक माहिती दिली आहे. आपल्या आईने ऍसिड पिऊन आत्महत्या केल्याचे मुनव्वरने सांगितले आहे. मुनव्वर फारुकीचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा आहे ही माहितीनी एका एपिसोडमध्ये कळाल्यानंतर प्रेक्षकांना धक्का बसला होता. 

लॉक अपच्या कार्यक्रमात स्पर्धकांना एक नवीन टास्क देण्यात आला होता. प्रत्येक स्पर्धकाला एक शब्द देण्यात आला होता आणि त्या शब्दावरून आपल्या खासगी आयुष्यातील काहीतरी सांगण्याचे या टास्कमध्ये सांगण्यात आले होते. तेव्हा फारुकीच्या वाट्याला आई हा शब्द आला होता. तेव्हा फारुकीने सांगितले की, २००७ साली तो आपल्या कुटुंबीयांसोबत गावी राहत होता. तेव्हा सकाळी खूप थंडी पडली होती, सकाळी ७ वाजता आपल्या आजीने आपल्याला उठवले आणि आईची तब्येत बिघडल्याचे सांगितले. आईला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केल्याचे मुनव्वरने सांगितले. 

आईने प्राशन केले ऍसिड

मुनव्वरने सांगितले की जेव्हा आम्ही आईला रुग्णालया नेले तेव्हा वेदनेने ती जोरजोरात ओरडत होती. तेव्हा आपल्यासोबत आपले वडील, बहीण उपस्थित होते, त्यांना याबद्दल काहीच माहित नव्हते. नंतर आईला दुसर्‍य रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी आईवर उपचार केले तरी त्याचा काही फरक पडला नाही. आईने ऍसिड प्यायल्याचे आपल्या काकीने सांगितले असे मुनव्वरने सांगितले.  


साडेतीन हजार रुपयांचे कर्ज

मुनव्वरने सांगितले की मी आईचा हात धरून बसलो होतो आणि वाटलं की सगळं काही ठीक होईल. तेव्हा काही डॉक्टर्र आपसांत चर्चा केली, त्यानंतर त्यांनी आईच्या हातून माझा हात सोडवला. तेव्हा मला कळाले की माझ्या आईचा मृत्यू झाला आहे. नंतर मुनव्वरने सांगितले की २००७ चा काळ आमच्यासाठी फार कठीण होता. माझ्या आईने एका सावकाराकडून साडेतीन हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. हा सावकार दर महिन्याला येऊन ७०० रुपये मागायचा. आज मी पैसे कमावतोय, माझ्या आयुष्यात स्थैर्य आहे पण याचा काय फायदा? आपल्याकडे साडेतीन हजार रुपये का नव्हते अशी खंत आपल्याला आयुष्यभर राहील असे मुनव्वरने म्हटले आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी