Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका, जिममध्ये वर्कआऊट करताना पडले बेशुद्ध

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 10, 2022 | 16:24 IST

Raju Srivastava Health Condition: मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्कआऊट दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका (heart attack) आला आणि ते ट्रेडमिलवरून पडले. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Raju Srivastava
राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका 
थोडं पण कामाचं
  • प्रसिद्ध कॉमेडियन (Famous comedian) राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
  • त्यांना हृदयविकाराचा झटका (heart attack) आला आणि ते ट्रेडमिलवरून पडले.
  • जिममध्ये उपस्थित लोकांनी त्यांनी तात्काळ दिल्ली एम्समध्ये नेलं.

नवी दिल्ली: Raju Srivastava Heart Attack: प्रसिद्ध कॉमेडियन (Famous comedian)  राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्कआऊट दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका (heart attack) आला आणि ते ट्रेडमिलवरून पडले. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत (Health) सुधारणा झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता पण आता त्यांची प्रकृती ठीक आहे. लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तास निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.

अधिक वाचा- उद्या रक्षाबंधन, नारळी पोर्णिमा 200 वर्षांनंतर आलाय 'असा' भन्नाट

जिममध्ये वर्कआऊट करत असताना राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अचानक बिघडली. ते बेशुद्ध पडले. जिममध्ये उपस्थित लोकांनी त्यांनी तात्काळ दिल्ली एम्समध्ये नेलं. जिथे डॉक्टरांनी हृदयविकाराची पुष्टी केली. राजू श्रीवास्तव यांच्या भावाने ही माहिती मीडियाला दिली आहे.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर त्यांचे चाहते चांगलेच चिंतेत होते. सोशल मीडियावर पोस्ट करून प्रत्येकजण आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. 

कशी आहे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती?

राजू श्रीवास्तव यांची पल्स आता ठीक असल्याची माहिती कॉमेडियनचे पीआरओ अजित सक्सेना यांनी दिली आहे. त्यांची प्रकृती अजूनही स्थिर आहे. अजित सक्सेना यांनी असेही सांगितले की, डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी त्यांचे आधीचे रिपोर्ट मागवले आहेत. त्यानंतरच डॉक्टर त्यांची बायपास शस्त्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय घेतील.

राजू श्रीवास्तव यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, ते सध्या भाजप नेते आणि उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत. नोएडामध्ये फिल्म सिटी उभारण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने ते प्रमुख भूमिका बजावत आहेत.

या शोमधून कॉमेडियन क्षेत्रात ठेवलं पहिलं पाऊल

राजू श्रीवास्तव यांनी टीव्हीच्या टॅलेंट शो 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'सह स्टँड-अप कॉमेडीमध्ये प्रवेश केला आणि या शोमध्ये उपविजेतेपद पटकावले. त्यांना ‘कॉमेडीचा राजा’ म्हटलं जातं. या प्रसिद्ध कॉमेडियनने बिग बॉस, नच बलिए यांसारख्या अनेक रिअॅलिटी शोमध्ये नशीब आजमावलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी